टॉलिवूडचा सुपरस्टार पवन कल्याण याची पत्नी अॅना लेझनेवा हिने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलाला जन्म दिला. पवनने आपल्या या मुलाचे नाव मार्क शंकर पवनोविच ठेवल्याचे वृत्त व्हायरल झाले. मात्र, मुलाच्या नावाविषयी या अभिनेत्याने स्वतःहून अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, या बाळाच्या नावावरून सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.

वाचा : बिग बी तिला भेटायला पोहोचले अन्..

पवनने आपल्या नवजात बाळाला उचलून घेतानाचा एका फोटो काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पवन आणि अॅनाला एक मुलगी असून तिचे नाव पोलेना असे आहे. मुळची रशियाची असलेल्या अॅनाशी लग्न करण्यापूर्वी पवनने नंदिनी आणि रेणू देसाई यांच्याशी विवाह केला होता. नंदिनीशी त्याने १९९७ साली लग्न केले होते. मात्र, हा संसार अवघी दहा वर्षेच टिकला. २००७ मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर २००९ मध्ये पवन त्याची ‘जॉनी’ चित्रपटातील सहअभिनेत्री रेणू देसाई हिच्याशी विवाहबद्ध झाला. हा संसारही केवळ तीन वर्षे टिकला आणि त्यांनी २०१२ साली घटस्फोट घेण्याचे ठरवले. रेणू आणि पवन यांना मुलगा अकिरा आणि मुलगी आध्या ही दोन अपत्ये आहेत. २०१३ मध्ये अॅना आणि पवनच्या नात्यासंबंधीचे वृत्त सर्वांसमोर आले.

वाचा : ‘मन्नत’च्या किंमतीपासून ते आत्महत्येची धमकी देणाऱ्या अभिनेत्यापर्यंत सर्व काही एका क्लिकवर

‘कटमरायूडू’ या शेवटच्या चित्रपटात पवन अभिनेत्री श्रुती हसन हिच्यासोबत झळकला होता.

Story img Loader