मराठीमध्ये सध्या ऐतिहासिक चित्रपट येत आहेत. याच ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘पावनखिंड’. ‘पावनखिंड’ (Pawankhind) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. या चित्रपटामध्ये अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका उत्तमरित्या साकारली. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. खरंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहिला. या चित्रपटाचं क्रेझ अजूनही कायम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – अमोल कोल्हेंच्या ऐतिहासिक चित्रपटातील गाण्याला प्रसिद्ध बॉलिवूड गायकाचा आवाज, ‘बम बम भोले’ गाणं ऐकलंत का?

अजय यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पुणे विमानतळावरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्याचं झालं असं की अजय दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्याबरोबर पुणे विमानतळावर पोहोचले. पुढील चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अजय, दिग्पाल, मृणाल दुसऱ्या शहरात जात असल्याची चर्चा आहे.

पाहा व्हिडीओ

पण ही संपूर्ण टीम जेव्हा पुणे विमानतळावर पोहोचली तेव्हा तिथल्या टीव्हीवर ‘पावनखिंड’ चित्रपट सुरु होता. दरम्यान अजय यांना प्रत्यक्ष पाहिल्यानंतर विमानतळावरील मंडळी भारावून गेली. अजय यांनी हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, ” योगायोग…’पावनखिंड’ चित्रपट टीव्हीवर सुरु असताना आम्ही पुणे विमानतळावर पोहोचलो. प्रत्यक्ष बाजीप्रभु देशपांडे यांना समोर पाहिल्यानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला. ती मजाच काही और.”

आणखी वाचा – ‘पावनखिंड’मध्ये बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलं घर

पुणे विमानतळावरील कर्मचाऱ्यांना देखील यावेळी कलाकारांना पाहून आनंद झाला. तसेच त्यांनी अजय यांच्याबरोबर फोटो काढण्यास सुरुवात केली. अजय यांनी बाजीप्रभु देशपांडे ही भूमिका रुपेरी पडद्यावर फक्त साकारली नाही तर ते ही भूमिका जगले. त्यांची मेहनत चित्रपटामध्ये स्पष्टपणे दिसून आली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pawankhind historical marathi movie on tv at pune airport actor ajay purkar share video on instagram fans get surprised see details kmd