आज सगळीकडे फक्त विश्वचषक स्पर्धा २०२३ च्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्याचीच चर्चा पाहायला मिळत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान सामना झाला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ७० धावांनी विजय मिळवला. भारताच्या विजयाचा हिरो सात गडी बाद करणारा मोहम्मद शमी ठरला आहे. मोहम्मद शमीचं सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. एका अभिनेत्रीने तर त्याला लग्नाचीही मागणी घातली होती. न्यूझीलंडला हरवल्यानंतर पुन्हा या अभिनेत्रीने केलेले ट्वीट चर्चेत आहेत.

काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड व श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शमीने जबरदस्त कामगिरी केली होती. त्यानंतर अभिनेत्री पायल घोषने त्याला लग्नाची मागणी घातली होती. “शमी तू इंग्रजी सुधार…मी तुझ्याशी लग्न करण्यासाठी तयार आहे,” अशी पोस्ट त्यावेळी तिने केली होती. पायलने शमीच्या इंग्रजीची खिल्ली उडवल्याने नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोलही केलं होतं. त्यानंतर आता तिने १५ नोव्हेंबर रोजी केलेल्या पोस्टने लक्ष वेधलं आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीने मोहम्मद शमीला घातली थेट लग्नाची मागणी! पण असणार ‘ही’ एकच अट, म्हणाली…

पायलने संपूर्ण मॅचदरम्यान अनेक पोस्ट केल्या. ‘शमी यू ब्युटी’, ‘कॅच सोडलीस’, ‘विकेट तर घ्या’, ‘विश्वास बसत नाहीये शमीच्या एकाच मॅचमध्ये सात विकेट्स’ अशा पोस्ट तिने केल्या आहेत.

payal ghosh tweet
पायल घोषने केलेली पोस्ट
payal ghosh tweet
पायल घोषने केलेली पोस्ट

दरम्यान, या मॅचनंतर मोहम्मद शमीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सात विकेट घेत त्याने न्यूझीलंडचा निम्म्यापेक्षा जास्त संघ पव्हेलियनमध्ये माघारी धाडला आणि भारताला विश्वचषक स्पर्धा २०२३ च्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांदरम्यान आज उपांत्य फेरीतील दुसरा सामना आहे. आज जो संघ जिंकेल त्यांच्यशी रविवारी १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये भारताची लढत होईल.