अभिनेत्री पायल राजपूतने पंजाबी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये काम केले आहे. पायलने RX-100 या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण केले होते. या चित्रपटात पायल बोल्ड अंदाजात दिसली आहे. या चित्रपटाचा हिंदी रीमेक तडप हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. याच चित्रपटातून बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटामुळे आता RX-100 हा चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे. या चित्रपटात अभिनेता कार्तिकेय गुम्माकोंडा आणि पायल दिसले होते. पायलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओवरून ट्रोल झाल्यानंतर पायलची आई संतापली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पायलचा हा व्हिडीओ तेलुगूसिनेमाकॉम या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या व्हिडीओत पायल ब्रालेस असून तिने पिवळ्या रंगाचं ब्लेझर परिधान केले आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे.

आणखी वाचा : लग्नानंतर अंकिताला पती विकीने भेट म्हणून दिलं ५० कोटींच ‘हे’ गिफ्ट

आणखी वाचा : लग्नाला होकार देण्यापूर्वी कतरिनाने विकीसमोर ठेवली होती ‘ही’ एक अट

दरम्यान, पायलचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिच्या आईने तिला चित्रपटसृष्टी सोडण्यास सांगितले आहे. जेव्हा त्यांनी हा व्हिडीओ पाहिला तेव्हा त्यांनी लगेच पायलला फोन करत विनंती केली की चित्रपटसृष्टी सोडून देण्यास सांगितले. पुढे त्या म्हणाल्या, तिला ज्या प्रमाणे ट्रोल करण्यात येत आहे ते सहन करू शकत नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Payal rajput trolling for her braless photoshoot users trolled her mother says to leave film industry dcp