सुप्रसिद्ध अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह यांनी त्यांच्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. पायल-संग्राम शनिवारी (९ जुलै) विवाहबंधनात अडकले. अगदी मोजक्याच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. आग्रा येथील जेपी पॅलेसमध्ये पायल-संग्रामने लग्न करण्याचं ठरवलं होतं. याच ठिकाणी या सेलिब्रिटी कपलचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. पायल-संग्रामच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
आणखी वाचा – अग्गंबाई सूनबाई! सासूबाईंना वाढदिवसाला आलिया भट्टने काय दिलं? नीतू कपूर म्हणाल्या…
पायल-संग्राम जवळपास १२ वर्ष एकमेकांना डेट करत होते. अखेरीस दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पायलने तिच्या लग्नासाठी लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. तिच्या लेहेंग्यावर संपूर्ण वर्क केलेलं दिसत आहे. तर संग्रामने डिझायनर शेरवानी आणि फेटा घातला होता. दोघांचा लूक अगदी परफेक्ट होता. तसेच पायल-संग्रामच्या लग्नाचे फोटो पाहता दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.
पायलने डिझायनर लेहेंगा, महागडे दागिने परिधान केले होते. पण तिच्या लूकची खासियत म्हणजे स्वतःच्याच लग्नात तिचा नो मेकअप लूक पाहायला मिळाला. तिच्या या लूकवरून नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून काही प्रश्न देखील विचारले. एका युजरने विचारलं की, “स्वतःच्याच लग्नात मेकअप का केला नाही?” पण पायलने स्वतःच्याच लग्नात मेकअप न करण्याचं बहुदा ठरवलं असावं.
आणखी वाचा – “घरात घुसून मारलं होतं ना…”; करण जोहरवर पुन्हा संतापली कंगना रणौत, निमित्त ठरला ‘कॉफी विथ करण’ शो
दोन्ही कुटुंबाती मंडळी आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितच लग्न करायचं हे पायल-संग्रामचं ठरलं होतं. १२ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर पायल संग्रामशी लग्न करायला तयार नव्हती. यामागील कारण कंगना रणौतच्या ‘लॉकअप’ शोमध्ये पायलने सांगितलं होतं. ती कधीच आई बून शकत नाही म्हणून तिला संग्रामशी लग्न करायचं नव्हतं. पण संग्रामचं पायलसाठी असणारं प्रेम कधीच कमी झालं नाही. आणि दोघांनी लग्न करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.