बॉलिवूड अभिनेत्री कंगन रणौतच्या ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोचा विजेता स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी ठरला आहे. पायल रोहतगी या शोची उपविजेता ठरली. पण शोचा विजेता कोण होणार अशी चर्चा सुरु असताना पायल विजेता होऊ शकते असे म्हटले जातं होते. पण मुनव्वर फारूकी विजेता ठरला. शो दरम्यान, पायल अनेक वादग्रस्त विधान करत होती. पायल धर्माच्या आधारे मुनवरला टार्गेट करत असल्याचे म्हटले जातं आहे.

शो संपल्यानंतर पायलने ‘ETimes’ ला मुलाखत दिली होती. “लॉकअपमध्ये माझा एक अद्भुत प्रवास होता आणि मी त्याचा खूप आनंद लुटला. मी खऱ्या आयुष्यात जशी आहे त्याच प्रकारे माझ्या पद्धतीने मी माझा खेळ खेळला. कारण यामुळे तुमचे व्यक्तिमत्व दिसते. कधी कधी तुमचे शब्द चुकीच्या पद्धतीने घेतले जातात पण मला वाटते की आपण स्वतंत्र देशात राहतो त्यामुळे आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. लोक माझ्याबद्दल काय म्हणतात याची मला पर्वा नाही”, असे पायल म्हणाली.

आणखी वाचा : संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

आणखी वाचा : शनिदेव करणार मार्गक्रमण, या ४ राशींच्या लोकांना करिअरमध्ये होणार जबरदस्त फायदा

शोदरम्यान पायलवर धर्माच्या आधारावर मुनव्वरला टार्गेट केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर ती म्हणाली, “मला हे स्पष्ट करायचे आहे की, लॉकअपच्या विजेत्यावर घडलेल्या प्रकारामुळे कोणत्याही धर्माला टार्गेट केल्याबद्दल किंवा कोणाच्याही भावना दुखावल्याबद्दल माझ्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आलेली नाही. मी धर्माबद्दल बोलते पण त्यावर भाष्य करत नाही. मी तिहेरी तलाकबद्दल बोलले, तर मी कोणत्याही धर्माला कसे टार्गेट करू? हे तर घडतच आहे ना, जर आपल्याला कोणत्याही धर्मात चुकीचे काही दिसत असेल तर आपण त्याबद्दल बोलू. आपण अशा देशात राहतो जिथे सर्व धर्म समान आहेत. काही लोकांना वाटते की मी एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करते पण तसे नाही. माझ्याविरुद्ध नाही तर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल लॉकअपच्या विजेत्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली आहे. एक भारतीय म्हणून माझे मत मांडते. मग लोकांनी मला कट्टर म्हटले तरी हरकत नाही, पण जर मी कट्टर असते तर मी अजमा फल्लाह आणि जीशानच्या जवळ गेले नसते.”

आणखी वाचा : बॉलिवूडला मी परवडणार नाही म्हणणाऱ्या महेश बाबूचे आलिशान घर पाहिलेत का?

पुढे पायल म्हणाली, “शोच्या निकालाने मी खूश आहे. संग्राम खूप थकला होता म्हणून मी लगेच सेटवरून निघाले. तो बराच वेळ सेटवर बसून होता. त्याला भुक लागली होती आणि खूप दमला होता. त्याला इतका वेळ शूटिंग करण्याची सवय नाही आणि तो लंच टाईमच्या आधी पोहोचला होता. त्यामुळे आम्ही शो संपल्यानंतर लगेच निघण्याचा निर्णय घेतला. मला हा शो ऑफर करण्यात आला याचा मला आनंद आहे. मला त्याची संकल्पनाही खूप आवडली.”

Story img Loader