ट्विटर, फेसबुकसारख्या सोशल माध्यमांवर सातत्याने अॅक्टीव्ह असणा-या सेलिब्रिटींमध्ये प्रियांका चोप्राचा समावेश होतो. गेल्याच वर्षी ‘सोशल मिडीयावरील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी’ म्हणून प्रियंकाची निवड झाली होती. मात्र, आता बॉलिवुडची ब्युटी क्वीन प्रियांका चोप्रा सोशल मिडीयावरील चाहत्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे त्रस्त झाली आहे. सोशल मिडीयावर व्यक्त होताना अनेक लोक कोणाचाही धाक नसल्यामुळे कशाचेही भान न बाळगता आपली मते व्यक्त करतात. त्यांची ही वक्तव्ये इतकी क्षुद्र दर्जाची असतात की त्यामुळे कधी कधी मनात चीड उत्पन्न होते असे प्रियंकाने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले. प्रत्येकाला त्याचे जीवन हवे तसे जगु द्या, इतरांचा द्वेष करू नका अशी विनंती प्रियंकाने लोकांना केली आहे.
It amazes me how vulnerable people are on social media now.when I joined it I always told my peers it was such a great way of spreading luv
— PRIYANKA (@priyankachopra) February 27, 2014
I was reading some tweets and articles and peoples comments..Anonymous people with no idea of people’s lives but yet being so nasty and mean
— PRIYANKA (@priyankachopra) February 27, 2014