कास्टिंग काऊचच्या मुद्द्याने आता पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून बरेच सेलिब्रिटी यावर मतप्रदर्शन करत आहेत. एकीकडे कोरिओग्राफर सरोज खान यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून टीका होत असताना आता अभिनेत्री रिचा चड्ढाने त्यांची पाठराखण केली आहे. कास्टिंग काऊचच्या मुद्द्याला लोक राईचं पर्वत करत आहेत, अशी प्रतिक्रिया तिनं दिली आहे.

‘या सर्व गोष्टी (कास्टिंग काऊच वगैरे) कित्येक वर्षांपासून सुरुच आहेत. प्रत्येक मुलीवर कोणीतरी बळजबरी करण्याचा प्रयत्न करतो. सरकारचे लोकही यात मागे नाहीत. पण, मग तुम्ही या चित्रपटसृष्टीलाच का दोष देताय? याच चित्रपटसृष्टीमुळे अनेकांचा उदनिर्वाह होतो. कमीत कमी ती बलात्कार करुन सोडून तर देत नाही’, असं सरोज खान म्हणाल्या. या विधानामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. यावर कास्टिंग काऊच प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळतं, मग बॉलिवूडलाच का धारेवर धरलं जातं, असा सवाल करत रिचानेही सरोज खान यांना साथ दिली.

Photos : ‘संजू : व्यक्ती एक छटा अनेक’

‘बॉलिवूडमध्ये असे (कास्टिंग काऊच) प्रकार सर्वाधिक होत असतात असं म्हटलं जातं, पण हे सत्य नाही आहे. या मुद्द्याला राईचं पर्वत केलं जात आहे. प्रत्येक क्षेत्रात ही गोष्ट पाहायला मिळते असंच सरोज खान यांना म्हणायचं होतं,’ असं रिचा म्हणाली. #MeToo मोहिमेअंतर्गत जगभरातील महिलांनी लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवला आणि कास्टिंग काऊचच्या मुद्द्याने पुन्हा एकदा जोर धरला.

Story img Loader