अभिनेता राणा डग्गुबाती हा ‘बाहुबली’ चित्रपटामुळे जागतिक स्तरावर ओळखला जाऊ लागला आहे. राणाचं फॅन फॉलोइंग खूप मोठं आहे. त्याच्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. त्यामुळे राणा विविध कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतो. दोन वर्षांपूर्वी राणा डग्गुबातीने मिहिका बजाजशी लग्न केले. त्याच्या लग्नाच्याही सर्वत्र चर्चा होत्या. आता या दोघांबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे चाहते सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन करत आहेत.
आणखी वाचा : भाऊबीजेच्या दिवशी श्वता नंदाने उलगडलं अभिषेक बच्चनबरोबरच्या हसत्या-खेळत्या नात्याचं गुपित, फोटो व्हायरल
राणा डग्गुबाती आणि मिहिका बजाज नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो पोस्ट करत असतात. अशातच मध्यंतरी मिहिकाने त्यांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. तो फोटो पाहून ते दोघे लवकरच आई-वडील होणार आहेत, असा अंदाज नेटकरी लावत आहेत. ही बातमी समजल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. पण राणा आणि मिहिका यांनी आतापर्यंत अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. यापूर्वीही एकदा मिहिका आई होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, परंतु मिहिकाने त्या सर्व अफवा असल्याचे सांगितले. त्यामुळे आता राणा किंवा मिहिका काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा : विजय सेतुपतीचा भाव वाढला, ‘जवान’ चित्रपटासाठी आकारले ‘इतके’ कोटी मानधन
राणा डग्गुबाती आणि मिहिका बजाज एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखत होते. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात कधी रुपांतर झाले ते त्यांना कळलेही नाही. लॉकडाऊनमध्ये राणा आणि मिहिकाचे लग्न झाले. हे लग्न अत्यंत मोजक्या लोकांच्या उपास्थितीत पण थाटामाटात पार पडले. तेव्हापासून हे दोघे कधी गोड बातमी देणार याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.