प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियन सेल्वन’ चित्रपट मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची मुख्य भूमिका असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री त्रिशा कृष्णनही महत्वपूर्ण भूमिकेत आहे. या चित्रपटात ऐश्वर्याची जरी मुख्य भूमिका साकारत तरी ‘पोन्नियन सेल्वन’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी मात्र वेगळे चित्र दिसले. ‘पोन्नियन सेल्वन’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये ऐश्वर्यापेक्षा अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘पुष्पा २’मध्ये लागली ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची वर्णी, पहिल्यांदाच दिसणार रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनबरोबर

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या सौंदर्यावर करोडो लोक फिदा आहेत. ऐश्वर्या तिच्या सौंदर्याने सर्वांना खिळवून ठेवते. ‘पोन्नियन सेल्वन’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटला ऐश्वर्या आणि त्रिशा कृष्णन दोघीही हजर होत्या. अशात दोघींना पाहून सोशल मीडियावर प्रेक्षक त्यांची तुलना लागले आणि यात तृषा भाव खाऊन गेली.

या कार्यक्रमदारम्यान त्रिशाने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. या साडीत ती फार सुंदर दिसत होती. तर ऐश्वर्याने काळ्या रंगाचा ड्रेस आणि त्याच रंगाची ओढणी घेतली होती. त्रिशाच्या लुकला नेटकऱ्यांनी अधिक पसंती दिली. तिच्यापुढे ऐश्वर्या रायचा लुक एकदम फिका ठरला. ‘पोन्नियन सेल्वन’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटसाठी ऐश्वर्याने निवडलेल्या या आऊटफिटवर नेटकऱ्यांनी टीका केली. ऐश्वर्याचा लुक पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं. एका नेटकाऱ्याने लिहीलं, “किती भयानक दिसतेय”, तर दूसरा नेटकरी म्हणाला, “ऐश्वर्या म्हातारी झाली”, अशा अनेक कमेंट्स करत  ऐश्वर्याला ट्रोल केलं गेलं.

आणखी वाचा : रजनीकांत यांना पाहताक्षणी ऐश्वर्या रायने केलं असं काही, व्हिडीओ व्हायरल

दुसरीकडे, त्रिशाचं सोशल मीडियावर जबरदस्त कौतुक झाले. “याला म्हणतात ओरिजनल ब्युटी” अशा कमेंट्स करत अनेक नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले. ‘पोन्नियन सेल्वन’च्या ट्रेलर लॉन्चचे फोटो भराभर व्हायरल झाले. पण यात ऐश्वर्याऐवजी त्रिशाचीच चर्चा अधिक चालली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People trolled aishwarya ray over her looks at trailer launch event rnv