भारती सिंग आणि कपिल शर्मा अनेक वर्षांपासून चांगले मित्र आहेत. दोघांनी एकत्र खूप काम केले आहे. मागील काही वर्षांपासून भारती ‘द कपिल शर्मा शो’चा भाग आहे. जेव्हा कपिलने नेटफ्लिक्स स्पेशल शो ‘कपिल शर्मा: आय एम नॉट डन यट’ मध्ये परफॉर्म केले, तेव्हा भारती त्याच्या शोमध्ये कुटुंबातील सदस्य म्हणून सामील झाली. भारतीने कपिलला प्रत्येक सुख-दु:खात साथ दिली आहे. आता कपिल खूप धैर्याने आणि त्याच्या क्षमतेच्या जोरावर परत आल्याचा खुलासा तिने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारती सिंग कपिल शर्माचे कौतुक करायला कधीच कमी पडत नाही. तिने सांगितले की अनेकजण असा विचार करायचे की ‘मद्यपान करण्याच्या सवयीमुळे कपिल संपला. पण कपिलने अगदी जोरदार पुनरागमन केले.’ भारती पुढे म्हणाली, ‘कपिलने कधीही हार मानली नाही. त्याच्या जीवनात अनेक चढ-उतार आले, परंतु त्याने हार मानली नाही. तो आजही स्वतःच्या हिंमतीवर शो चालवत आहे. अमिताभ बच्चन असो, शाहरुख खान असो किंवा अजून कोणी असो, प्रत्येकाला या शोमध्ये यायचं आहे.’

Photos : सर्वाधिक उंचीवर असलेल्या ‘या’ रेस्तराँमध्ये मिळते २४ कॅरेट Gold Tea; सना खाननेही घेतला आस्वाद

मागील काही काळामध्ये कपिलला मद्यपानाचे व्यसन लागले होते. २०१८मधील एका रिपोर्टनुसार, कपिल शर्मा दारूचे व्यसन सोडवण्यासाठी बेंगळुरू येथील आयुर्वेदिक आश्रमात दाखल झाला होता. कपिलने डिप्रेशनशी लढा देण्याबाबत आधीच सांगितले आहे.

भारती सिंग सध्या तिच्या गरोदरपणाचा आनंद घेत आहे. भारती आणि हर्ष लिंबाचिया पहिल्यांदाच पालक होण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People used to say now it is over bharti singh gets emotional over kapil comeback pvp