मराठी चित्रपटसृष्टीतील आजचा आघाडीचा अभिनेता कोण, या प्रश्नाचं सध्या वेगवेगळ्या निर्माते-दिग्दर्शकांकडे ‘स्वप्निल जोशी’ असं एकच उत्तर आहे. स्वप्निलची ‘चॉकलेट बॉय’ ही प्रतिमा लोकोंनी इतकी उचलून धरली आहे की रोमँटिक हिरो म्हणून स्वप्निल हा प्रेक्षकांचा आणि दिग्दर्शकांचा आवडता आहे. त्यामुळेच आजघडीला सर्वाधिक चित्रपट त्याच्याकडे आहेत. स्वप्निल मात्र या यशाचं श्रेय आपल्या दिग्दर्शकांना आणि प्रेक्षकांना देतो. अभिनेत्याची प्रतिमा लोक घडवतात, त्याचे चाहते घडवतात, असं स्पष्ट मत तो व्यक्त करतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘रोमँटिक हिरो’ ही स्वप्निलची प्रतिमा लोकांच्या मनात ठसली आहे. ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘दुनियादारी’, ‘मितवा’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘तू ही रे’ अशा त्याच्या सगळ्याच चित्रपटांवरून नजर फिरवली तर तो एकमेव ‘प्रेमी हिरो’ आहे. पण म्हणून त्याच प्रतिमेत आपण अडकून पडतोय, अशी भीती त्याला कधीच वाटत नाही. लोकांना एखाद्या कलाकाराची भूमिका आवडली की ते त्याला अक्षरश: डोक्यावर घेतात, त्याला पुन्हा पुन्हा पाहणं पसंत करतात त्यामुळे प्रतिमा ही लोकांच्या मनात तयार होत असते, असं स्वप्निल म्हणतो.
‘फ्रेंड्स’ या चित्रपटात स्वप्निल खरोखरच तरुण लुकमध्ये लोकांसमोर येणार आहे. या चित्रपटात महाविद्यालयातील यारीदोस्ती निभावताना स्वप्निल दिसणार आहे. ही भूमिका आपल्यासाठी वेगळी होती, असं स्वप्निल सांगतो. ‘मुळात, या चित्रपटाचे दिग्दर्शक आर. मधेश यांनी दक्षिणेत जे काही अफलातून चित्रपट केले आहेत, त्यांनी आजवर कमल हसन, ऐश्वर्या राय, रजनीकांत यांच्यासारख्या कलाकारांबरोबर केलेलं काम पाहता त्यांना त्यांच्या मराठी चित्रपटात मला घ्यावंसं वाटलं हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. दक्षिणेकडचा दिग्दर्शक आहे तो मराठी चित्रपट कसा करेल, असे काही प्रश्न माझ्या मनात आले नाहीत. कारण आपल्या भावना या सगळीकडे सारख्याच असते, भावनेला भाषा नसते. ‘फ्रें ड्स’च्या कथेत तो भावनिक बंध आहे. भाषेच्या पलीकडे नेणारा, अतिशय मराठमोळी भावना असणारा हा चित्रपट त्यामुळेच मला करावासा वाटला,’ असं तो म्हणतो. ‘फ्रेंड्स’साठी स्वप्निलला वजन कमी करणार का, असा प्रश्न दिग्दर्शक आर. मधेश यांनी विचारला होता. त्यामुळे चित्रपटाच्या आधीच स्वप्निलने वजनही घटवलं आणि त्याला खूप तरुण तरीही थोडा रफ-टफ लुक या चित्रपटासाठी दिला गेला आहे.
जय-वीरू जोडीसारखा दोस्ताना
स्वप्निल जोशी आणि सचित पाटील या दोघांची मैत्री हा ‘फ्रेंड्स’चा मुख्य गाभा आहे. सध्या राऊडी बाईकवर बसलेल्या स्वप्निल आणि सचितचे छायाचित्र समाजमाध्यमांपासून सगळीकडे चर्चेचा विषय ठरले आहे. ‘शोले’ चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि धर्मेद्र यांच्या ‘जय-वीरू ’ जोडीसारखीच ही जोडी असल्याची पावती त्यांना मिळते आहे. याबद्दल स्वप्निलला विचारणा के ल्यावर तो खूप खूश झाला. ‘खरोखरच चित्रपटातील आमची जोडी ‘जय-वीरू’सारखी दिसावी, असावी यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत’, असं स्वप्निलने सांगितलं. म्हणजे आपल्या वाडीतल्या सर्वोत्तम खेळाडूलाही आपण ‘काय सचिन तेंडुलकरसारखा खेळतोस रे..’ अशी सहज दाद देऊन टाकतो. सवरेत्कृष्ट खेळाडूचं प्रतीक म्हणून आपण त्यांना सचिनची उपमा देतो तसंच काहीसं इथे झालं आहे. आजवर चित्रपटातील मैत्रीचा उल्लेख निघाला की ‘जय-वीरू’ ही ‘शोले’चीच जोडी आठवते. त्या दर्जापर्यंत या चित्रपटातील दोन्ही नायकांची मैत्री नेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, असं सांगणाऱ्या स्वप्निलला सचित आणि तो पहिल्यांदाच एकत्र काम करत असल्याचा फायदाही या चित्रपटाला मिळेल, असं वाटतं.
सध्या संजय लीला भन्साळींसारख्या हिंदीतील मोठय़ा बॅनरच्या पहिल्या मराठी चित्रपटात तो काम करतो आहे, आर. मधेशसारख्या दिग्दर्शकाबरोबर काम करतो आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये बॅनर किंवा आपली प्रतिमा काय होईल, याचा विचार आपण करत नसल्याचं तो म्हणतो. इतर दिग्दर्शकांबरोबर काम करताना मला एक मोकळीक वाटते. आर. मधेशसारख्यांबरोबर काम करताना सतत काही ना काही शिकायला मिळतं. एक अभिनेता म्हणून मी त्यांच्या चित्रपटांना न्याय देऊ शकेन, असं त्यांना वाटतं. त्यामुळे माझ्यासाठी जबाबदारी आणखीन वाढली आहे, असं स्वप्निलने सांगितलं.
आज त्याला मिळालेल्या यशाचं श्रेय लोकांबरोबरच त्याला विविध भूमिका देणाऱ्या दिग्दर्शकांनाही देतो. आपण या सगळ्यांमुळेच कृतार्थ असल्याचे तो म्हणतो. निर्मात्यांनी अभिनेता म्हणून माझ्यावर लावलेले पैसे त्यांना परत मिळाले तरच मला माझ्या कामाचं समाधान मिळतं, असं सांगणाऱ्या स्वप्निलची व्यावसायिक निष्ठा हीच त्याच्या यशाची गुरुकिल्ली ठरली आहे.
‘टीव्हीवर एखादी भूमिका केली आणि ती गाजली. तर आयुष्यभर तो कलाकार त्या प्रतिमेत अडकतो, अशी भीती मला तेव्हा कित्येकांनी दाखवली होती. मी तर ‘कृष्णा’सारखी एक मोठी, सर्वाधिक चाललेली आणि गाजलेली पौराणिक मालिका केली. ‘कृष्णा’ची मुख्य आणि कधीही लोकांच्या मनातून सहजी जाणार नाही, अशी भूमिका केली, पण म्हणून माझ्यातील अभिनेता संपला नाही. एवढी मोठी पौराणिक व्यक्तिरेखा साकारल्यानंतरही लोकांनी मला विविध भूमिकांमधून स्वीकारले. यापुढेही आपली प्रतिमा, प्रतिष्ठा यांचा विचार करणार नाही आणि काही तरी वेगळं करायचा अट्टहास म्हणूनही हटके भूमिका किंवा चित्रपट करणार नाही. मला कथा आवडली, चित्रपट आवडला आणि निर्मात्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो सार्थ ठरेल, असा विश्वास आतून वाटतो तेव्हाच मी चित्रपट स्वीकारतो.
ल्ल स्वप्निल जोशी