मराठी अभिनेत्री सई ताम्हनकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सई नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांना भेटते. आता लवकरच सई अभिनेता ललित प्रभाकर सोबत मुख्य भूमिकेत असलेल्या ‘पेर पुराण’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
‘पेट पुराण’ ही सीरिज आधुनिक काळातील श्रमजीवी जोडप्याच्या मानसिकता व प्राध्यानक्रमामधील संघर्षाना दाखवते. या जोडप्याला मुलं नको असतं. त्यांचा या सगळ्याकडे एक वेगळा दृष्टीकोन असतो. मग ते प्राणी पाळण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर ते कशा प्रकारे त्या प्राण्यांना पाळतात हे तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल.
आणखी वाचा : ‘या’ जन्मतारखा असलेल्या व्यक्ती असतात नशीबवान, कोणत्याही क्षेत्रात मिळवतात यश
आणखी वाचा : भर गर्दीत बाबा सिद्दीकींनी सलमान खानला हात धरून खेचले, आणि..; पाहा हा Viral Video
सोनी लिव्हवर ६ मे पासून सुरू होणाऱ्या या शोमध्ये अदितीच्या भूमिकेत सई ताम्हणकर आणि अतुलच्या भूमिकेत ललित प्रभाकर आहे. ‘पेट पुराण’ची निर्मिती व लेखन दिग्दर्शक ज्ञानेश जोटिंग यांनी केले आहे आणि ह्यूज प्रॉडक्शन्सचे रणजित गुगले हे या शोचे निर्माते आहेत. #पेटपुराण मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली या भाषांमध्ये पाहता येईल.