प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री रोजलिन खान ही सध्या चर्चेत आली आहे. रोजलिन खान ही सध्या कर्करोगाची झुंज देत आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. रोजलिन ही गेल्या ७ महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत आहे. सध्या ती मुंबईतील रुग्णालयात दाखल उपचार घेत आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे.
रोजलिन खान ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिने तिला कर्करोग झाल्याचे सांगितले आहे. तसेच तिची याच्याशी कशाप्रकारे झुंज सुरु आहे, याबद्दलही तिने भाष्य केले आहे. त्याबरोबर तिने विविध ब्रँडला एक आवाहनही केले आहे. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : “१८ वर्षांपूर्वी मी आईला गमावलं आता…”; प्रसिद्ध अभिनेत्रीला स्तनाच्या कर्करोगाचे निदान
रोजलिन खान नेमकं काय म्हणाली?
“कर्करोग…कठीण परिस्थितीत जगणाऱ्या लोकांचं जगणं काही सोपं नसतं, असे कुठेतरी वाचलं होतं. पण मला आता याची जाणीव होतेय की हे माझ्यासारख्या लोकांसाठी आहे. देव नेहमीच त्याच्या खंबीर सैनिकाला सर्वात कठीण लढाई देत असतो. हा माझ्या आयुष्यातील एक अध्याय असू शकतो.
मला मिळालेला प्रत्येक धक्का हा मला अधिक खंबीर बनवतो. हा देखील तसाच आहे. माझ्यासाठी अनेक लोक प्रार्थना करत आहेत. जे काही होते ते चांगल्यासाठी होते आणि ते माझ्यासाठी ते चांगले आहे. मला कर्करोगाची कोणतीही लक्षण जाणवत नव्हती. अनेकदा पाठीत दुखणं किंवा मानेकडील भाग दुखायचा. जिम्नॅस्टिकमुळे त्या वेदना होत असाव्यात असे मला सुरुवातीला वाटले. पण पाठदुखी वाढल्यानंतर मी तपासणी केल्यावर मला कर्करोग झाल्याचे समजले. बरं झालं ते लवकर कळालं….!!
पण प्रिय ब्रँड्स, मी तुमच्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शूट करण्यासाठी उपलब्ध असेन. कारण मला पुढील ७ महिन्यांसाठी केमोथेरपी घ्यावी लागणार आहे आणि प्रत्येक केमोथेरपीनंतर एक आठवडा विश्रांती घ्यावी लागेल. त्यामुळे आता तुम्हाला टक्कल असलेल्या मॉडेलबरोबर काम करण्यासाठी आणि तिला काम देण्यासाठी हिंमत दाखवावी लागेल. पण मी शेवटच्या क्षणांपर्यंत काम करेन”, अशी भावूक पोस्ट रोजलिन खानने केली आहे.
आणखी वाचा : शिवसेनेचा पदाधिकारी, ८ वर्षांचे रिलेशन आणि घटस्फोट, जाणून घ्या अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल…
रोजलिन खानची पोस्ट वाचल्यानंर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. करिश्मा शर्मा ते केआरके खान यासारखे कलाकार यावर कमेंट करताना दिसत आहे. या सर्वांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न करत तू लवकर बरी होशील, असे सांगितले आहे. तसेच तिला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
दरम्यान रोजलिन ही मुंबईत राहते. ती अभिनेत्री आणि मॉडेल आहे. काही वर्षांपूर्वी तिने PETA साठी फोटोशूट केले होते. ती स्तनाच्या कर्करोगाच्या जनजागृतीशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी झाली होती. अनेक टीव्ही जाहिरातींमध्येही तिने काम केले आहे. तिने एका अडल्ट वेबसीरिजमध्येही काम केले होते. यात तिने सविता भाभी हे पात्र साकारलं होतं. यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती.