ऑस्कर पुरस्कार विजेता हॉलिवूड अभिनेता फिलिप सिमोर हॉफमन यांचे निधन झाले आहे. ते ४६ वर्षाचे होते. ड्रग्जच्या अतिसेवनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिका-यांनी दिली.
न्यूयॉर्कमधील फिलिप यांच्या अपार्टमेंटमधील बाथरुममध्ये ते मृतावस्थेत आढळले. यावेळी त्यांच्या हाताला इंजेक्शनची सुई होती. त्याचबरोबर पोलिसांनी त्यांच्या घरातून हेरॉईनही जप्त केले आहे. हॉपमन यांच्या मृत्युच्या कारणांचा तपास सुरु आहे.


फिलिप हॉपमन यांना ‘कॅपोट’ चित्रपटातील दमदार अभिनयासाठी २००५मध्ये ऑस्करने गौरवण्यात आल होते. तसेच ते सर्वोत्कृष्ट सहअभिनेता म्हणून तीन वेळा ऑस्करमध्ये नामांकितही झाले होते. याशिवाय ‘द हंगर गेम्स: कॅचिंग फायर या चित्रपटात त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. त्यांच्या मृत्युमुळे हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. याचसोबत बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनीही फिलिप यांच्या निधनाबाबत ट्विटरवरून हळहळ व्यक्त केली.

Story img Loader