अभिनेता आयुष्मान खुराना त्याच्या चित्रपटांद्वारे समाजातील विविध विषयांवर भाष्य करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्या चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांनी पसंत केले आहे. त्याने सिनेसृष्टीमध्ये स्वत:चे अढळ स्ठान निर्माण केले आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला त्याचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी आयुष्मानने सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर पोस्ट करुन केली होती. ‘ड्रीम गर्ल २’ मध्ये त्याच्यासह अनन्या पांडे दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदा एकत्र ऑनस्क्रीन दिसणार आहे.

‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाची कथा फार गमतीशीर होती. या चित्रपटामध्ये आयुष्मान ‘पूजा’ या खोट्या नावाचा वापर करुन एका कॉल सेंटरमध्ये काम करत असतो. चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये तो नव्या अवतारामध्ये दिसणार आहे. ‘ड्रीम गर्ल २’ च्या चित्रीकरणाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा आयुष्मानचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
amazing magic of the students of the Zilla Parishad school
पडदा पडताच गायब झाला चिमुकला! जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची भन्नाट जादू पाहून मनापासून हसाल! Viral Video बघाच
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड

आणखी वाचा – “याआधी कधीच..” रॉजर फेडररच्या निवृत्तीवर अभिनेत्री ईशा गुप्ताची भावून पोस्ट

या फोटोमध्ये त्याने लाल रंगाचा सलवार-कुर्ता घातला आहे. दोन वेण्या असलेला केसांचा विग त्याच्या डोक्यावर आहे. तसेच या भूमिकेसाठी त्याने महिलांसारखा मेकअप देखील केला आहे. आयुष्मानचा हा फोटो स्पष्ट दिसत नसला तरी, त्यावरुन त्याच्या या आगामी चित्रपटामध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळणार असल्याचे लक्षात येत आहे.

आणखी वाचा – पुरुष स्त्रीरोगतज्ञांची व्यथा मांडणाऱ्या आयुष्मान खुरानाच्या ‘या’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

आयुष्मानच्या या आगामी चित्रपटामध्ये विजय राज, परेश रावल, अभिषेक बॅनर्जी, अन्नू कपूर, राजपाल यादव, मनोज जोशी, सीमा पावा आणि मनजोत सिंग अशी कलाकारांची तगडी फौज आहे. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. टीझरमध्ये हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदला म्हणजेच २९ जून २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राज शांडिल्य हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. एकता कपूर चित्रपटाच्या निर्मात्या आहेत.

Story img Loader