अनेक अडचणींवर मात करत पद्मावत सिनेमाला सर्व राज्यांमध्ये सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडू हिरवा कंदिल मिळाला. येत्या २५ जानेवारीला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चालत असलेल्या वादात सोशल मीडियावर सिनेमाशी निगडीत अनेक मीम्स तयार करण्यात आले. वेगवेगळे फोटो जोडून तयार करण्यात आलेले पद्मावतसंदर्भातील हेच मीम्स आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आता अरविंद केजरीवाल यांचा हा फोटो पाहा… दीपिका पदुकोणच्या जागी केजरीवाल यांचा फोटो लावून धरनावती असे टायटल त्याला दिले आहे. हे तर फक्त एकच मीम्स आहे… पद्मावतशी निगडीत असे अनेक मीम्स सोशल मीडियावर तयार करण्यात आले आहेत.
गूगल सर्चवर पद्मावत सिनेमाच्या तिकीट सर्चवरही जोक तयार करण्यात आले. जेव्हा तुम्ही एखाद्या सिनेमाच्या तिकीट बुकींगसाठी गुगल सर्च करता तेव्हा तिथे एक नोटिफिकेशन येते. पण पद्मावतबाबत सर्च करताना करणी सेनेला तुमचा पत्ता जाणून घेण्याची इच्छा असते असे दाखवण्यात आले आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये पद्मावती ते पद्मावतपर्यंतचा प्रवास आणि या सिनेमाला होणारा करणी सेनेचा विरोध दाखवण्यात आला आहे.
या फोटोमध्ये पद्मावतच्या प्रदर्शनाच्या तारखेची थट्टा उडवण्यात आली आहे. पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख आतापर्यंत अनेकदा बदलण्यात आली आहे. एकाने मला विचारले की तू पद्मावत सिनेमा प्रदर्शित होण्याची केव्हापासून वाट पाहत आहेस? या प्रश्नाचे उत्तर देताना हॉलिवूड सिनेमा टायटॅनिकमधील आजीचा फोटो दाखवत ८४ वर्ष असे उत्तर मिळते. तर दुसरीकडे २५ जानेवारीला पॅडमॅन सिनेमा पाहणाऱ्यासाठी उत्सुक असलेले आणि पद्मावत सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक असलेल्यांची रांग दाखवण्यात आली आहे.
शाहिद कपूरवरही यावेळी जोक करण्यात आले. त्याचा उडता पंजाब सिनेमा प्रदर्शित झाला होता तेव्हा संपूर्ण पंजाब त्याच्या मागे पडला होता. आता पद्मावतमुळे राजपुत मागे पडले आहेत, असे मिम्स तयार करण्यात आले आहे.
सलमान खानचे मिम्सही पद्मावतसाठी वापरण्यात आले. सगळ्यात मजेशीर तर पुढील मिम्स आहे. एका राजपूत कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाल्यावर त्याची घूमर डान्सवर काय प्रतिक्रिया असणार हे दाखवण्यात आले आहे.