सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपट ‘हनुमान’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमार १० दिवसांआधी लग्नबंधनात अडकली आहे. गेले काही दिवस तिच्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर अभिनेत्रीने तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. वरलक्ष्मीने तिच्या बॉयफ्रेंडशी परदेशात लग्नगाठ बांधली. अभिनेत्रीने लग्नातील काही सुंदर क्षणांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांना लग्नाची झलक दाखवली.

वरलक्ष्मीने लग्नासाठी खास लाल साडी नेसली होती. तर तिचा पती निकोलाई सचदेव याने पारंपरिक दाक्षिण्यात पद्धतीचे कपडे लग्नात घातले होते. तिने मांग टिका, केसात गजरा, गळ्यात सुंदर नेकलेस घालून तिचा लूक पूर्ण केला. तसेच तिने पतीबरोबर रोमँटिक पोज दिल्या. तिच्या लग्नात दोघांचे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक व मोजकेच मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
marathi actress hemal ingle kelvan photos
थायलंडला बॅचलर पार्टी, कोल्हापुरात केळवण! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; फोटो आले समोर

Video: बच्चन कुटुंबाच्या फोटोत सूनबाईंची गैरहजेरी; ऐश्वर्या रायला लेकीसह पाहताच रेखा पुढे आल्या अन् बिग बींच्या नातीला…

वरलक्ष्मीने लग्नातील काही रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. तिने या फोटोंना सुंदर कॅप्शन दिले आहे. “अखेर माझ्या मनातील परीकथेप्रमाणे लग्न झाले. माझ्या राजकुमाराने मला लग्नासाठी विचारले की मी त्याच्याशी लग्न केले. कायमचे एकमेकांचे झालो. हा प्रेम आणि आनंद कायम असाच राहो. आय लव्ह यू निकोलाई,” असं कॅप्शन वरलक्षीने दिलं आहे. या जोडप्याने भारतात नाही तर परदेशात लग्न केलं. त्यांनी थायलंडमधील क्राबी या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग केले. त्यांच्या लग्नातील सुंदर फोटो चर्चेत आहेत.

शुभमंगल सावधान! अखेर अनंत अंबानी-राधिका मर्चंट लग्नबंधनात अडकले, पहिला फोटो आला समोर

१४ वर्षांपासून वरलक्ष्मी व निकोलाई रिलेशनशिपमध्ये

वरलक्ष्मी आणि निकोलाई गेल्या १४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तेव्हापासून ते सोबत आहेत. अभिनेत्रीने याच वर्षी १ मार्च रोजी मुंबईत एंगेजमेंट केली होती. त्याचे फोटोही तिने शेअर केले होते. तेव्हापासून तिच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. वरलक्ष्मी ही प्रसिद्ध अभिनेते आर सरथकुमार यांची मुलगी आहे. अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये जवळपास २५ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने २०१२ मध्ये आलेला तमिळ चित्रपट ‘पोडा पोडी’ मधून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तिचा पती निकोलाई हा सुप्रसिद्ध गॅलरिस्ट आहे.

Radhika Merchant Wedding Look: अंबानींच्या धाकट्या सूनबाईंचा शाही थाट, पाहा राधिका मर्चंटचे लग्नातील Photos

वरलक्ष्मीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास ती अखेरची प्रशांत वर्माच्या ‘हनुमान’ या चित्रपटात दिसली होती. यामध्ये ती तेजा सज्जाच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली होती. लवकरच ती धनुषबरोबर त्याच्या आगामी ‘रायन’ या चित्रपटात झळकणार आहे.

Story img Loader