मराठी चित्रपटात कलाकारांच्या अभिनयाबरोबरच त्यातील आशयाला देखील प्राधान्य दिले जाते. असाच आशय आणि अभिनयसंपन्न असलेला ‘फुलवंती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पद्माविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘फुलवंती’ या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’ हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने ‘फुलवंती’ची प्रमुख लक्षवेधी भूमिका साकारली आहे.पेशवाईत लोककला आणि लोककलावंत यांना मोठा राजश्रय मिळत असे, याच काळात ‘फुलवंती’ आपली कला सादर करण्यासाठी मुघल दरबारात जात असे. मुघल दरबारात कला सादर करणारी ‘फुलवंती’ आपल्या अस्मानी सौंदर्य आणि मनमोहक नृत्याने सर्वांची मने जिंकण्याचा प्रयत्न का करते? या प्रश्नाचे उत्तर या चित्रपटातून उलगडणार आहे.

स्नेहल प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘फुलवंती’ या चित्रपटात प्राजक्ता माळीसह प्रसाद ओक, गश्मीर महाजनी, वैभव मांगले, हृषिकेश जोशी, स्नेहल, मंगेश देसाई, जयवंत वाडकर, समीर चौघुले, चिन्मयी सुमित, सविता मालपेकर, विभावरी देशपांडे, क्षितीश दाते, गौरव मोरे, वनिता खरात, रोहित माने, पृथ्वीक प्रताप, चेतना भट, विजय पटवर्धन, सुखदा खांडकेकर, अदिती द्रविड, निखिल राऊत, दीप्ती लेले, राया अभ्यंकर आदि मराठीतील नामवंत कलाकारांची फौज दिसणार आहे.

हेही वाचा >>>“त्या सीझनमध्ये एकाही मुलाला सोडलं नाहीस”, राखी सावंतने केली निक्कीची बोलती बंद; म्हणाली, “आय लव्ह यू बोलून…”

‘फुलवंती’ ही मंगेश पवार अॅण्ड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित भव्य कलाकृती ११ ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संवादलेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे यांचे आहे. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. संगीतकार – अविनाश विश्वजीत असून; नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रॉडक्शन, मुरलीधर छटवानी, रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. तर चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.