‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाच्या ट्रेलरविरोधात दाखल केलेली याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि प्रोमोचे प्रदर्शन थांबवावे या मागणीसाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती.

पंतप्रधान हे संविधानिक पद आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे माजी पंतप्रधान आणि देशांची प्रतिमा मलिन होत आहे त्यामुळे या ट्रेलरचे प्रक्षेपण रोखण्यात यावे अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. या चित्रपटात चुकीची माहिती दाखवण्यात आली असून हा ट्रेलर दिशाभूल करणारा आहे असे याचिकाकर्त्याने म्हटले होते. या ट्रेलरमधून सिनेमॅटोग्राफी कायद्याच्या नियम ३८ चे उल्लंघन होत आहे असे याचिकाकर्त्याने म्हटले होते.

वाचा : मुन्ना-सर्कीटची जादू पुन्हा चालणार; ‘मुन्नाभाई ३’ लवकरच

मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काही काळ त्यांचे माध्यम सल्लागार असलेले संजय बारू यांनी लिहीलेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकावर हा चित्रपट आधारलेला आहे. हे पुस्तक पूर्वी अनेकवेळा वादातही सापडलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील आक्षेपार्ह दृश्य काढून टाकावी अन्यथा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशा इशारा युथ काँग्रेसनं दिला होता. दरम्यान, या चित्रपटामुळे ज्यांच्यावर थेट परिणाम झाला आहे त्यांनाच कोर्टात जाण्याचा अधिकार आहे असे म्हणत ही याचिका फेटाळण्यात आली.

Story img Loader