‘सत्यमेव जयते’ या आमिर खानच्या कार्यक्रमाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. राजमुद्रेचा वापर न करताच ‘सत्यमेव जयते’ असे लिहिण्यात येत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. याबाबत उच्च न्यायालयाने संबंधित वाहिनी आणि आमिर खान याला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ममोरंजन राय नावाच्या एका व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे.
‘सत्यमेव जयते’ या शिर्षकाला केंद्र गृहमंत्रालयाने याआधी क्लीन चीट दिली आहे. बोधचिन्हातील केवळ ‘सत्यमेव जयते’ वापरल्याने कायद्याचा किंवा नियमांचा भंग होत नाही. राष्ट्रीय बोधचिन्हाचा गैरवापर होऊ नये, यासाठी कायद्यात व नियमांत तरतूद करण्यात आली आहे, असे गृहमंत्रालयाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. याच मुद्दयांवर मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्न चिन्ह उपस्थित केले असून, उद्या जर कोणी ‘सत्यमेव जयते’ प्रमाणे फक्त अशोकस्तंभाचा वापर केला, तर ते केंद्र सरकारला चालणार आहे का? अशा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे. या याचिकेची पुढील सुनावणी २० एप्रिलला होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा