बॉलीवूडमधील बहुप्रतिक्षित ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील गाणी आणि कलाकारांचे लूक प्रदर्शित करण्यास चित्रपटकर्त्यांनी सुरुवात केली आहे. यातील गाणी आणि कलाकारांचे लूक डोळ्यांची पारणे फेरणारे आहेत. या चित्रपटातील ‘पिंगा’ गाणे आज प्रदर्शित होणार असून यातील दीपिका आणि प्रियांकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
मराठमोळ्या अंदाजातील या दोन्ही अभिनेत्री खूप मोहक दिसत आहेत. नववारी साडी आणि त्यावर पेशवाई पद्धतीचे दागिने यामुळे प्रियांका आणि दीपिकाच्या सौंदर्यात अधिकच भर पडलेली दिसते. पिंगा गाण्याचे नृत्यदिग्दर्शन रेमोने केले आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी येत्या १८ डिसेंबरला प्रदर्शित होईल.

Story img Loader