विकी कौशलचा ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. २०१९ या वर्षातला हा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. ‘उरी’ने जगभरामध्ये २०० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या यशानंतर चित्रपटाविषयी साऱ्यांचाच जोश एकदम वाढल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे संसदेत आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्येही ‘उरी’चा जोश दिसून आला. केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्पामध्ये चित्रपटसृष्टीतील काही योजना जाहीर करताना ‘उरी’चा उल्लेख केला. त्यानंतर संपूर्ण संसदेमध्ये How’s The Josh चा जयघोष सुरु झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पियुष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत हंगामी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मनोरंजन क्षेत्राशी संबंधित सगळ्या परवानग्या एकाच खिडकीवर मिळणार, असल्याची घोषणा गोयल यांनी केली. त्यानंतर संसदेत उपस्थित असलेल्या सत्ताधारी खासदारांनी How’s The Josh चा जयघोष केला. खासदारांच्या या जयघोषामुळे सभागृह दणाणून गेलं होतं.

‘मनोरंजन क्षेत्रामुळे अनेक जणांना रोजगार मिळतो. आपण सारेच चित्रपट पाहतो. इतर क्षेत्रांप्रमाणेच मनोरंजन क्षेत्राचं महत्वही अनन्य साधारण आहे. या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगार मिळतो. मात्र अनेक वेळा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी किंवा प्रदर्शित झाल्यानंतर तो लीक होतो. मात्र हे होऊ नये यासाठी आम्ही तरतूद करणार आहोत. पायरसी रोखण्यासाठी कठोर कायदा आणू अशीही घोषणा गोयल यांनी केली. त्यानंतर सत्ताधारी खासदारांनी ‘How’s The Josh’ म्हणत बाकडी वाजवून या निर्णयाचं स्वागत केलं.

दरम्यान, ‘उरी’ने तिसऱ्या आठवड्यातही दमदार कामगिरी करत जगभरातील एकूण कमाईचा आकड्याने २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटाने २९ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर ३४ कोटींची कमाई केली आहे. तर देशामध्ये या सिनेमाच्या कामाईने १६५ कोटींचा टप्पा ओलांडला आहे.