ब्लॉकबस्टर ‘पीके’ चित्रपटाने चीनमध्ये ११३ कोटींचा गल्ला कमावून एक नवा विक्रम केला आहे. ‘पीके’च्या या यशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हातभार लागल्याची चर्चा आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ते १६ मे चीनचा दौरा केला होता.  त्यानंतर ‘पीके’ला जणू जॅकपॉट लागला आणि चित्रपटाने केवळ २० दिवसातच ११३ कोटींची कमाई केली. या दौ-या दरम्यान मोदींच्या उपस्थितीत इरॉस इंटरनॅशनल आणि चीनच्या अग्रगण्य चित्रपट कंपन्यांच्या एकत्रीकरणाची घोषणाही करण्यात आली.
पीके नंतर २२ मे रोजी चीनमध्ये ४५०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झालेल्या ३ इडियट्सने १६ दिवसांत १०० कोटींचा गल्ला पार केला आहे. जागतिक स्तरावर सर्वाधिक कमाई करणा-या टॉप पाच चित्रपटांमध्ये पहिले तीन चित्रपट हे मि. परफेक्टशनिस्ट आमिरचेचं आहेत. ‘पीके’, ‘धूम ३’ आणि ‘३ इडियट्स’ या चित्रपटांनी पहिली तीन स्थाने पटकाविली आहेत. ‘पीके’ने जागतिक स्तरावर आतापर्यंत ६०० कोटींचा गल्ला पार केला आहे.

Story img Loader