आमिर खानच्या ‘पीके’ या चित्रपटातील अनेक विषयांची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. यानिमित्ताने आमिरच्या आतापर्यंतच्या चित्रपटातील वेगवेगळ्या लूक्सची तुलना होणे साहजिकच असले तरी, ‘पीके’मध्ये आमिर पूर्णपणे नवीन आणि हटके दिसत आहे, हे मान्य करावेच लागेल. यापूर्वी त्याने भूमिकेची गरज म्हणून पेहराव, केस, शरीरयष्टीमध्ये ‘परफेक्ट’ बदल करत चित्रपटातील व्यक्तिरेखा अधिक परिणामकारक करण्याचा प्रयत्न केला होता.
आमिरचा लकी ‘डिसेंबर’
मात्र, ‘पीके’मध्ये या सगळ्याची जी काही भट्टी जमून आली आहे त्याला तोड नाही. एखाद्या भूमिकेसाठी कलाकाराला किती कष्ट घ्यावे लागतात, याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास, आमिरने ‘पीके’च्या संवादांसाठी घेतलेल्या मेहनतीचे सांगता येईल. ‘पीके’ ही व्यक्तिरेखा भोजपूरी बोलणारी असल्यामुळे आमिरला भोजपुरी शिकवण्यासाठी दिग्दर्शक राजू हिराणी यांनी शांतिभूषण यांची नियुक्ती केली होती.
पाहा: कोण ठरला ‘पीके’चा बॅटरी रिचार्ज?
आमिरने ‘पीके’च्या भूमिकेसाठी अक्षरश: खर्डेघाशी केली असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. कारण, आमिर शांतिभूषण यांना चित्रपटाचा प्रत्येक संवाद भोजपूरीत बोलायला सांगायचा आणि आमिर त्यांनी बोललेला प्रत्येक शब्द कागदावर जसाच्या तसा इंग्रजीत(फोनेटिक) उतरवून घ्यायचा. अशाप्रकारे, तब्बल तीन-चार महिने आमिरने चित्रपटाचा प्रत्येक संवाद कागदावर लिहून पाठ केला आहे. यातील काही इंग्रजी किंवा हिंदी शब्दांचे भोजपूरीतील उच्चार शिकताना आमिरच्या नाकीनऊ आले होते. हे सर्व करताना आपली मेहनत लोकांपर्यंत पोहचेल की नाही, लोकांना आपले भोजपूरी संवाद कळतील की नाही, याची भितीही त्याला सतावत होती.
‘पीके’कडून शिकण्यासारख्या पाच गोष्टी
मात्र, शेवटी ‘मि.परफेक्शनिस्ट’ हार न मानता प्रयत्न करत राहिला आणि भोजपुरी भाषेचा लहेजा आणि उच्चार समजून घेतल्यानंतरच चित्रपटाच्या शुटिंगला उभा राहिला. चित्रपटाच्या ट्रेलरमधील आमिरच्या संवादांची झलक पाहता त्याची ही मेहनत पूर्णपणे फळाला आली असे म्हणता येईल. मात्र, आमिरच्या भोजपुरी भाषेचा गोडवा तुम्हाला संपूर्णपणे अनुभवायचा असेल तर चित्रपटगृहात जाऊन ‘पीके’ बघितलाच पाहिजे.
‘पीके’च्या स्क्रिनिंगला राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकरची हजेरी