आगामी चित्रपट ‘पीके’चा पहिला पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. नग्नअवस्थेत हातात केवळ रेडिओ असलेल्या आमिरचा हा पोस्टर अश्लील आणि नग्नतेच्या श्रेणीत येतो अशी याचिका काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र, सदर पोस्टर अश्लील असल्याचे ठरवण्यात सामाजिक कार्यकर्ते अयशस्वी ठरल्याचे आमिर खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानीने म्हटले आहे.
हेमंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी सुरु होती. हेमंत यांनी केलेल्या याचिकेत पोस्टरवरील आमिरचे आपत्तीजनक दृश्य हटवण्याची मागणी केली आहे. दीवानी न्यायालयात आमिर आणि हिरानीने यावर उत्तर देताना म्हटले की, या पोस्टरला ‘फिल्म पब्लिसिटी स्क्रिनिंग कमिटी’ या सरकारी संस्थेने मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे या पोस्टरवरील याचिका मान्य करू नये. तसेच, या प्रकरणी याचिका दाखल करणेदेखील घाईचे आहे. कारण, चित्रपट अजून पूर्ण तयारही झालेला नाही. चित्रपटाचा काही भाग चित्रीत करणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे मुद्रण नियंत्रक विभागाद्वारे याची पाहणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशाचप्रकारची याचिका यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे ही याचिकादेखील फेटाळली जावी, असे त्यांनी म्हटले. दिवानी न्यायालयाचे न्यायाधीश एमएस शर्मा यांनी दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्या असून २७ ऑगस्टसाठी खटला स्थगित केला आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा