पूर्वाश्रमीचे प्रियकर अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंग हे पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात ते एकत्र दिसतील. विशेष म्हणजे झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटासाठी अनुष्काने आयटम साँग चित्रीत केले आहे.
अनुष्का पहिल्यांदाच आयटम साँग केले आहे. ‘स्विंग’ या आयटम साँगमध्ये अनुष्का एकटीच दिसणार नसून तिच्यासोबत प्रियंका चोप्रा, फरहान अख्तर, अनिल कपूर आणि शेफाली शाह हे कलाकारही थिरकताना दिसतील. चित्रपटात रणवीर सिंह अनुष्काचा हीरो आहे; पण तो आयटम साँगमध्ये दिसणार नाही. ‘दिल धडकने दो’ पुढच्यावर्षी जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader