सलमान खानची ‘किक’ यावर्षी तिकीटबारीवर जोरदार बसली. सलमानच्या चित्रपटाने देशभरात २३३ कोटींची कमाई केली. त्यापाठोपाठ दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या शाहरूखच्या ‘हॅप्पी न्यू इअर’ने देशभरात २०० कोटींची कमाई केली. आत्तापर्यंत या वर्षीचे सर्वात हिट चित्रपट म्हणून ‘किक’ पहिला आणि ‘हॅप्पी न्यू इअर’ दुसऱ्या क्रमांकावर अशी स्थिती आहे. आता यावर्षीचा अखेरचा बिग बजेट आणि तिसरा खान आमिरचा ‘पीके’ प्रदर्शित होतो आहे. ‘पीके’ कुठेही कमी पडू नये, यासाठी खुद्द आमिर आणि निर्मात्यांनी हरएक प्रयत्न केले असून हा चित्रपट शुक्रवारी तब्बल सहा हजार चित्रपटगृहांमधून प्रदर्शित होणार आहे.
आमिरचा लकी ‘डिसेंबर’
आमिर खानने आपल्या वर्षभरातील एकमेवाद्वितीय चित्रपटासाठी अचूक वेळ निवडली आहे. नाताळच्या काही दिवस आधी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच नाताळच्या आधीचा शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस त्यांच्या हातात आहेत. यावेळी ‘पीके’ शिवाय कोणताही नविन चित्रपट प्रदर्शित होणार नाही आहे. त्यामुळे देशभरातील ५२०० चित्रपटगृहे आणि परदेशातील ८२० चित्रपटगृहांमधून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणावर प्रदर्शित केला जाणारा ‘पीके’ हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. नाताळही २५ डिसेंबरला गुरूवारी असल्याने तोही आठवडा ‘पीके’चाच असणार आहे. या आठवडय़ात ‘मुंबई कॅ न डान्स साला’ नावाचा एक छोटेखानी चित्रपट वगळता ‘पीके’शी स्पर्धा करण्यासाठी दुसरा कुठलाही चित्रपट नसणार आहे. अगदी नविन वर्षांच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत कुठलाही नविन हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याने ‘पीके’ला तीन आठवडे मिळणार आहेत.
पाहा: ‘पीके’च्या संवादांसाठी आमिरने घेतलेली मेहनत
खरेतर, आमिरच्या ‘पीके’ला अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ची स्पर्धा होती. मात्र, ऐनवेळी अनुरागने आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख मे पर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे आमिरच्या ‘पीके’साठी तिकीटबारीचा महामार्ग मोकळा झाला आहे. आता या संधीचा फायदा घेत आमिर दरवर्षीप्रमाणे मागून येऊन ‘खाना’वळीतील इतर खानांच्या पुढे जाणार की नाही, याबद्दल लोकांना उत्सूकता आहे.
पाहा: कोण ठरला ‘पीके’चा बॅटरी रिचार्ज?
आमिर आणि राजकुमार हिरानी या जोडगोळीच्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाने एकूण ३९५ कोटींची कमाई क रत विक्रम केला होता. हा विक्रम अजून कोणालाही मोडता आलेला नाही. ‘हॅप्पी न्यू इअर’नेही एकूण ३७७ कोटी कमाई केली असली तरी तो ‘थ्री इडियट्स’चा विक्रम मोडू शकलेला नाही. आता या जोडीचा दुसरा चित्रपट ‘पीके’ हा विक्रम मोडणार का?, याचे उत्तर येत्या तीन दिवसांत मिळेल.
‘पीके’कडून शिकण्यासारख्या पाच गोष्टी