बॉलिवूडमध्ये नवनवीन चेहरे येतच असतात. अनेक कलाकार चित्रपटसृष्टीत येतात. त्यातील काहींना प्रसिद्धी मिळते तर काहीजण या ग्लॅमरच्या दुनियेत आपला जम बसवण्यात अपयशी ठरतात. अशाच एका अभिनेत्रीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या अभिनेत्रीच नाव आहे पूनम झावर.

अभिनेता सुनील शेट्टीचा ‘मोहरा’ चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील ‘ना कजरे की धार….’ हे गाणे तर अनेकांना माहिती असेलच. या गाण्यात सुनील शेट्टीसोबत अभिनेत्री पूनम झावर झळकली होती. चित्रपटातील तिच्या निरागस लूकने त्यावेळी बऱ्याच जणांना घायाळ केले होते. आता जवळपास दोन दशकांनंतर ही अभिनेत्री पुन्हा एकदा सर्वांसमोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात पूनमने हजेरी लावली होती. पण, या अभिनेत्रीला तेव्हा कोणीच ओळखू शकले नाही.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
Couples unique dance
”हृदयी वसंत फुलताना..” गाण्यावर काका काकूंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम

mohra_031

mohra-poonam-jhawer-02

एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, पूनमने तिचे सौंदर्य खुलून दिसावे याकरिता सर्जरी केल्याचे कळते. पूनम सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय आहे. प्लास्टिक सर्जरीनंतरचे तिचे फोटो पाहिल्यास ही नक्की तिच पूनम आहे का? असा प्रश्न नक्कीच सगळ्यांना पडेल यात शंका नाही.

mohra-poonam-jhawer-03

अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या ‘ओह माय गॉड’ या २०१२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातही पूनमने काम केले होते. या चित्रपटात तिने साध्वी गोपीची भूमिका साकरली होती.

mohra-poonam-jhawer-01

Story img Loader