‘जुन्या गाण्यांचे रिमेक नाही केले पाहिजे. गाण्यांचे रिमेक केल्याने त्यांचे मूल्य कमी होते. जुन्या गाजलेल्या गाणी रिमेक करणे म्हणजे एखाद्या सुंदर बनारसी साडीला फाडून बिकीनी केल्यासारखे आहे,’ असे मत प्रख्यात पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी मांडले. अनुराधा यांनी बॉलिवूडमधील गाण्यांसोबत अनेक भजनेही गायली आहेत. ‘नवभारत टाइम्स डॉटकॉम’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रिमेक गाण्यांवर आपली मतं मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबद्दल त्या पुढे म्हणाल्या की, ‘गाण्यांचे रिमेक केल्याने त्यांचे मूळ अस्तित्व नष्ट होते. नवीन कलाकार फक्त गाजलेल्या जुन्या गाणी रिमेकसाठी निवडतात आणि नव्या व्हर्जनमध्ये प्रेक्षकांसमोर आणतात. मात्र त्या जुन्या गाण्यांच्या निर्मितीसाठी किती वेळ आणि मेहनत लागली याचा विचार ते करत नाहीत. रिमिक्स करणाऱ्या नवीन कलाकारांना गाण्यांची मोडतोड करून बेढंग पद्धतीने लोकांसमोर सादर करण्याचा हक्क कोणी दिला? आताची ही रिमिक्स गाणी म्हणजे एखाद्या सुरेख बनारसी साडीला फाडून बिकीनी किंवा स्विम सूट केल्यासारखं आहे.’

PHOTO : ‘गोल्ड’मध्ये मौनीचा ‘बंगाली लूक’

अनुराधा यांच्याही अनेक जुन्या गाण्यांचे रिमेक केले गेले. याबद्दल नाराजी व्यक्त करत त्या म्हणाल्या की, ‘मी गायलेल्या अनेक गाण्याचे रिमिक्स केले गेले, जे मला अजिबात आवडले नाहीत. रिमिक्स करणाऱ्यांमध्ये इतकी क्षमता हवी की गाण्याच्या मूळ स्वरुपाला कोणताही धक्का पोहोचता कामा नये आणि ही क्षमता कोणामध्येच नाही. माझ्या एका मित्राने मला सांगितले की मी गायलेल्या ‘आज फिर तुम पर प्यार आया है’ या गाण्याचा रिमेक आलाय. जेव्हा मी ते ऐकले तेव्हा माझा म्युझिक प्लेअरच खराब झाल्यासारखा मला वाटला. नंतर माझ्या लक्षात आले की रिमेकला योग्य लय देण्यात आले नाही. हे गाणे अत्यंत वाईट असल्याचे मी माझ्या मित्राला फोन करून सांगितले. जेव्हा मी मूळ गाणे ऐकले तेव्हा माझ्या मनाला शांती लाभली.’