प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास कोलकाता येथे आकस्मिक निधन झालं. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. वयाच्या ५३ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. सध्या त्याच्या कॉन्सर्टचा एक व्हिडिओ समोर येत आहे, ज्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतं आहे. या व्हिडीओत केकेला लाइव्ह कॉन्सर्टसुरु असताना स्टेजवरून बाहेर काढले जात असल्याचे दिसत आहे. ज्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, केकेचा शेवटच्या कॉन्सर्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

आणखी वाचा : नवऱ्यासाठी नवस! अभिनेता सुरज थापरच्या पत्नीने केले मुंडण, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

आणखी वाचा : करण जोहरच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या आले समोरा-समोर, अन् अभिषेकने केले असे काही…

आणखी वाचा : “शूटिंग दरम्यान अनोळखी व्यक्तिने २१ लाख रुपये देऊ केले तर…”, प्रवीण तरडेंनी सांगितला तो किस्सा

लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर काही वेळातच केके त्याच्या टीमसोबत हॉटेलकडे रवाना झाला. ईटाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर काही वेळातच केकेने छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला सीएमआरआय रुग्णालयात नेण्यात आले. जे हॉटेलपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर होते. तेथे डॉक्टरांनी केकेला मृत घोषित केले. सध्या त्याच्या कॉन्सर्टचा एक व्हिडिओ समोर येत आहे, ज्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Playback singer kk or krishnakumar kunnath last video before death watch dcp