प्रदर्शनापुर्वीच चर्चेत असलेल्या ‘शुटआऊट अॅट वडाळा’ या चित्रपटात गॅंगस्टर मन्या सर्वेची भूमिका साकारणे कठीण काम होते अशी कबुली अभिनेता जॉन अब्राहमने दिली आहे. ख-याखु-या घटनांवर आणि माणसावर बेतलेली मन्या सुर्वेची व्यक्तिरेखा साकारताना पुरेशी माहिती उपलब्ध नव्हती असंही तो पुढे म्हणाला.  
हा चित्रपट करताना आम्हाला जवळपास दोन दशके मुंबईच्या गुन्हेगारी जगताच्या बातम्या देणा-या पत्रकारांची मदत घ्यावी लागली, असं अभिनेता-निर्माता जॉन अब्राहम म्हणाला.   
मन्या सुर्वे आता हयात नाही. मुंबईच्या इतिहासातील ती पहिली चकमक होती. ती अतिशय इंटरेस्टिंग व्यक्तीरेखा आहे. मन्या सुर्वे हा अतिशय सामान्य महाराष्ट्रीय मुलगा होता, ज्याला इंजिनीअर व्हायचे होते पण काही गोष्टींमुळे तो या गुन्हेगारी जगताच्या वाट्याला गेला. आमच्याकडे मन्या सुर्वेची काही छायाचित्रे होती आणि आम्ही काही जेष्ठ पत्रकारांकडून त्याची माहिती मिळवली. या चित्रपटाचा दिग्दर्शक संजय गुप्ताने खूप माहिती जमवली आहे, असं जॉन पीटीआयशी बोलताना म्हणाला.   
आगामी सुजीत सरकार दिग्दर्शित ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटात अभिनेत्री नर्गिस फाक्रीसोबत जॉन अब्राहम एका लष्करी अधिका-याची भूमिका साकारत आहे.  
मला असं वाटतं, एक अभिनेता म्हणून मी एकाच प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकून पडलो नाही आणि माझ्या अभिनयक्षमतेतही सुधारणा झाली आहे. रेस 2, आय मी और मैं आणि शुटआऊट अॅट वडाळा या तीनही चित्रपटात मी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत आहे.    
‘मद्रास कॅफे’ हा फार मोठा चित्रपट असून लंडन, क्लाला लांपूर, सिंगापूर, कोलंबो ते कोची आणि दिल्ली अशा आठ वेगवेगळ्या ठिकणी त्याचे चित्रिकरण करण्यात आले आहे. या चित्रपटात मी एका लष्करी अधिका-याशी भूमिका साकारत आहे, असं तो पुढे म्हणाला.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा