अभिनेते आणि भाजपा नेते सुरेश गोपी यांची मुलगी भाग्या सुरेश हिच्या लग्नसोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. भाग्या व श्रेयस मोहन यांचे आज (१७ जानेवारी रोजी) केरळमध्ये लग्न झाले. या लग्नात पंतप्रधान मोदींनी वधु-वराला आशीर्वाद दिले. मामूट्टी, मोहनलाल, जयराम आणि दिलीप यांसारखे मल्याळी स्टार्सही या लग्नाला उपस्थित होते.
गुरुवायूर मंदिरात २५ मिनिटं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लग्न सोहळ्याला पोहोचले होते. यादरम्यान, त्यांनी लग्नाच्या विधीत भाग घेतला. पीएम मोदी वधू पक्षाकडून मंदिरात पोहोचले होते. त्यामुळे त्यांनी वधू पक्षाच्या वतीने वधू-वरांना पुष्पहार देऊन शुभेच्छा दिल्या. भाग्या व श्रेयस यांच्या लग्नातील विधीमध्ये पंतप्रधान सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. या सोहळ्यातील पंतप्रधान मोदींचे फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत.
१९ वर्षांच्या संसारानंतर पतीपासून वेगळी झाली मराठमोळी अभिनेत्री, पण घटस्फोट घेणार नाही; कारण…
सुरेश गोपी यांच्या मुलीच्या लग्नात पंतप्रधानांनी वधू-वरांना काही वस्तू भेट म्हणून दिल्या. यावेळी मामूट्टी, मोहनलाल, दिलीप, बिजू मेनन आणि इतर चित्रपट कलाकार त्यांच्या कुटुंबियांसह कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधानांनी त्या सर्वांशी संवाद साधला आणि फोटो काढले.
खूपच साधं आयुष्य जगतो आमिर खानचा लेक, जुनैद खान काय काम करतो? जाणून घ्या
भाग्या व श्रेयसच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी सकाळी ८ वाजता गुरुवायूर येथील मंदिरात पोहोचले. आधी पारंपारिक कपडे परिधान करून त्यांनी गुरुवायूर मंदिरात पोहोचले आणि २५ मिनिटं पूजा केली व दर्शन घेतले. यानंतर पंतप्रधान मोदींनी अभिनेते-राजकारणी सुरेश गोपी यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावली.