पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाब दौऱ्यावर गेलेले असताना त्यांच्या सुरक्षेत काही गंभीर त्रुटी आढळून आल्या. काही आंदोलकांमुळे पंतप्रधानांचा ताफा १५ ते २० मिनिटे रस्त्यावरच थांबून होता. या प्रकारामुळे पंजाब सरकारवर जोरदार टीका होत आहे. भाजपा नेत्यांनी हे प्रकरण पंतप्रधानांना शारिरीक इजा करण्याचा प्रयत्न असल्याचे आरोप केले आहे. तर काँग्रेसचे खुनी हेतू असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी केला आहे. दरम्यान, अभिनेता कमाल आर खानने केलेले ट्वीट चर्चेत आहे.

कमाल आर खानचे प्रत्येक ट्वीट चर्चेचा विषय ठरते. विविध विषयांवर कोणीही विचारले नसताना हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक त्याची मते मांडताना दिसतो. सेलिब्रिटी त्याच्या ट्वीटकडे फारसे लक्ष देत नसले तरी नेटकरी मात्र त्याच्या ट्वीटची आतुरतेने वाट पाहात असतात. आता केआरकेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्याचा एक व्हिडीओ शेअर करत भाजपावर निशाणा साधला आहे.
PM Security Breach: ‘काँग्रेसवाल्यांनो तुम्ही मोदीजींचे काही वाकडे करु शकत नाही’, राजू श्रीवास्तवची प्रतिक्रिया

केआरकेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गाडी दिसत आहे. त्यांच्या गाडीच्या शेजारी काही लोक भाजपाचे झेंडे घेऊन उभे आहेत. हा व्हिडीओ शेअर करत त्याने, ‘तुम्ही स्वत: पाहा, मोदींच्या कार शेजारी भाजपाचे लोक आहेत. तरीही मोदींना भीती वाटते. म्हणजे मोदींना स्वत:च्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

काय आहे प्रकरण? काय घडलं होतं पंतप्रधानांसोबत?
बुधवारी फिरोजपूरमध्ये आंदोलकांनी नाकेबंदी केल्यामुळे पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर अडकला होता, त्यानंतर ते एका रॅलीसह कोणत्याही कार्यक्रमास उपस्थित न राहता पंजाबमधून परतले. यावेळी सुरक्षेची गंभीर त्रुटी राहिल्याचं निदर्शनास आलं. केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला तातडीने अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले. पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेसने पंतप्रधानांना शारीरिक हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपाने केल्याने या घटनेने मोठा राजकीय वाद निर्माण झाला, तर इतर पक्षांनीही कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर हल्ला केला.

Story img Loader