लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आली. निवडणूक आयोगाने या बायोपिकच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली. या निकालानंतर सोशल मीडियावर ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचीच सर्वाधिक चर्चा होऊ लागली. तर नेटकऱ्यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेरॉयला लक्ष्य केलं. सोशल मीडियावर बरेच हास्यास्पद मीम्ससुद्धा व्हायरल झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणूक आयोगाने विवेक ओबेरॉयचा अभिनय पाहिला आणि म्हणूनच थेट चित्रपटावर स्थगिती आणली, अशी मजेशीर प्रतिक्रिया एका युजरने दिले. तर चित्रपटाला स्थगिती मिळाल्यानंतर विवेक ओबेरॉयवर ‘चौकीदारा’ची नोकरी शोधण्याची वेळ आली आहे, असे एका युजरने लिहिले. काहींनी विवेकला २०२४ मध्ये राहुल गांधींच्या बायोपिकमध्ये काम करण्याचा सल्लाही दिला.

https://twitter.com/licensedtodream/status/1115916780155707392

‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास निवडणुकीत सर्व पक्षांना समान संधी मिळणार नाही. मोदींच्या बायोपिकमुळे निवडणुकीत भाजपाला झुकतं माप मिळू शकतं, असं निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवलं. निवडणुकीत सर्व पक्षांना समान संधी मिळावी यासाठी आयोगाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला लोकसभा निवडणूक काळापर्यंत स्थगिती दिली

विवेक ओबेरॉय या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे. विवेकसोबतच या चित्रपटात बरखा बिश्त जशोदाबेन तर अभिनेते मनोज जोशी हे अमित शाह यांच्या भूमिकेत आहेत. याशिवाय बमन इराणी, झरीना वहाब, सुरेश ओबेरॉय आणि प्रशांत नारायणन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केलं आहे..

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi biopic release stopped by ec memes viral on social media