आलिया भट्ट, भूमी पेडणेकर, रणवीर सिंग, रणबीर कपूरसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी दिल्लीत पतंप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मनोरंजन क्षेत्राच देशाच्या विकासातील योगदान, या क्षेत्रात काम करताना येणाऱ्या अडचणी आणि या बॉलिवूडचं भविष्य यासारख्या अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी बॉलिवूडनं मोदींची भेट घेतली. बॉलिवूडच्या प्रतिनिधी मंडळात आलिया भट्ट, भूमी पेडणेकर, रणवीर सिंग, रणबीर कपूर, विकी कौशल, आयुषमान खुराना, रोहित शेट्टी, करण जोहर, वरूण धवन, एकता कपूर, राजकुमार राव, अश्विनी अय्यर अशा कलाकार आणि दिग्दर्शक मंडळींचा समावेश होता.

चित्रपटाच्या तिकिटांवर घटवण्यात आलेला जीएसटी आणि या क्षेत्राच्या विकासासाठी घेण्यात आलेल्या अनेक निर्णयाबद्दल आभार मानण्यासाठी कलाकारांनी मोदींची भेट घेतली. तसेच या भेटीत मनोरंजन विश्वातील अनेक अडचणींवर चर्चा देखील झाली. बॉलिवूड ही जगातील सर्वात मोठ्या मनोरंजन विश्वापैकी एक गणली जाते त्यामुळे देशाच्या विकासात या क्षेत्राचा कसा हातभार लावता येईल आणि या क्षेत्राचं भविष्य सारख्या अनेक विषयांवर चर्चा झाल्या.

https://www.instagram.com/p/BsdDW4sjWjH/

यापूर्वी २०१८ मध्ये मोदींनी मुंबई आणि दिल्लीत बॉलिवूडच्या प्रतिनिधींची भेट घेतली होती. बॉलिवूडच्या प्रतिनिधींसोबतची ही भेट आणखी एका अर्थानं खास होती. कारण या प्रतिनिधी मंडळांत पहिल्यांदाच बॉलिवूडमधल्या महिला कलाकार आणि दिग्दर्शिकांचादेखील सामावेश करण्यात आला होता. गेल्याच महिन्यात मोदींनी बॉलिवूडच्या प्रतिनिधींची भेट घेतली होती यात एकही महिला कलाकाराचा समावेश नसल्यानं ट्विटरवर अनेक अभिनेत्रींनी तीव्र नाराजी दर्शवली होती.

Story img Loader