Oscar Awards 2023 : चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणाऱ्या ९५ व्या ऑस्कर पुरस्काराची घोषणा झाली आहे. यंदाचा ऑस्कर भारतासाठी फारच खास होता. ऑस्कर २०२३ साठी आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नामांकन मिळालं होतं. हा पुरस्कार आरआरआरने आपल्या नावावर केला आहे.

संगीतकार एमएम किरावानी आणि चंद्रबोस यांनी मंचावर जाऊन ऑस्कर पुरस्कार स्वीकारला. ‘नाटू नाटू’चा पुरस्कार स्वीकारताना किरावानी म्हणाले, “मी कारपेंटर्सची गाणी ऐकत मोठा झालो आणि आज माझ्या हातात ऑस्कर पुरस्कार आहे”. किरवानी यांचं स्टोजवर स्पीच सुरू असताना दीपिका पदुकोण भावूक झाली होती. बॉलिवूडमधील सेलिब्रिटी आणि सामान्य लोक सोशल मीडियावर या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

Govinda
३ दिवस ७५ लोकांच्या युनिटने गोविंदाची स्वित्झर्लंडमध्ये शूटिंगसाठी पाहिलेली वाट; प्रसिद्ध दिग्दर्शक खुलासा करत म्हणालेले, “३ दिवसानंतर…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
Huppa Huiyya 2 announcement
ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा
ajith kumar team won dubai car race 2
सरावादरम्यान क्रॅश झाली होती कार, तरीही जिंकली दुबईतील स्पर्धा; ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारवर कौतुकाचा होतोय वर्षाव
Marathi Actress Praises Sangeet Manapman Movie
“तुम्ही South च्या बाहुबलीचं कौतुक असेल तर…”, सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ पाहून मराठी अभिनेत्री भारावली, प्रेक्षकांना म्हणाली…
Premachi Goshta actress Swarda Thigale react on troller
“रिप्लेसमेंटवाल्या भूमिका कलाकारांनी घेऊ नये…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील बदलावर युजरची प्रतिक्रिया; नवी मुक्ता म्हणाली, “आजही कलेचे…”

आणखी वाचा : Oscar Awards 2023 : मिशेल योहने रचला इतिहास; उत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पटकावणारी ठरली आशियातील पहिली महिला

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या गाण्याचं कौतुक करत ट्वीट केलं आहे आणि या चित्रपटाच्या टीमला मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “अपवादात्मक… ‘नाटू नाटू’ गाण्याची लोकप्रियता साऱ्या जगभरात पसरली आहे. हे गाणं पुढील कित्येक वर्षं लोकांच्या स्मरणात राहील. एमएम किरावानी आणि चंद्रबोस या दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि हा सन्मान मिळवण्यासाठी संपूर्ण टीमचे अभिनंदन. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.”

ऑस्करच्या बेस्ट ओरिजिनल साँगसाठी ‘अप्लॉज’ (टेल इट लाइक अ वुमन), ‘होल्ड माय हँड’ (टॉप गन मॅव्हरिक), ‘लिफ्ट मी अप’ (ब्लॅक पाथेर वाकांडा फॉरेव्हर), आणि ‘दिस इज ए लाइफ’ (एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स) या गाण्यांना नामांकन मिळालं होतं. यापैकी एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटामधील ‘नाटू नाटू’ गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर मिळाला.

Story img Loader