गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल विवाहबंधनांत अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा साखरपुडा झाल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर येत्या डिसेंबरमध्ये ते दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यांच्या लग्नाची तयारी सुरु असल्याचे सांगण्यात येत होते. पण त्या दोघांनी अजून काही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, त्यांच्या लग्नात हजेरी लावणाऱ्या पाहूण्यांची यादी समोर आल्याचे म्हटले जाते.
कतरिना आणि विकीच्या लग्नाला पीएमओमधले ५ अधिकारी हजेरी लावणार आहेत. या पाचही अधिकाऱ्यांची सुरक्षेसाठी पीएमओने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मार्गाचा तक्ताही मागवला असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पीएमओच्या अधिकाऱ्यांना प्रोटोकॉलही उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे म्हटले जाते. कतरिना आणि विकीच्या लग्नात १०० बाउंसर सुरक्षेसाठी असणार आहेत. यासाठी जयपूरचे १०० बाऊन्सर चौथ का बरवरा येथील हॉटेल सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये येतील. हॉटेल प्रशासनाने हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही घरी सोडले आहे. हॉटेल सिक्स सेन्समध्ये सुरू असलेल्या बांधकामात अनेक कामगार काम करत होते, मात्र कतरिना आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर ४ डिसेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत सर्व कामगार रजेवर जाणार आहेत.हे सगळं करण्याचं कारण म्हणजे कतरिना आणि विकीच्या लग्नात कोणत्याही प्रकारचे अडथळे नको, असे सांगण्यात येत आहे.
आणखी वाचा : आपण एवढे श्रीमंत का आहोत? अक्षयच्या मुलाने विचारला होता प्रश्न, ट्विंकल म्हणाली…
आणखी वाचा : सौंदर्यासाठी नाही तर ‘या’ कारणामुळे अभिषेकने केले ऐश्वर्याशी लग्न
रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ राजस्थानमध्ये शाही लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाचे सगळे कार्यक्रम हे ७ ते १२ डिसेंबर दरम्यान होणार आहेत. दरम्यान, नुकताच कतरिनाचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कतरिना अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. तर दुसरीकडे विकीचा ‘उधम सिं’ग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.