सिनेमाचे पटकथा लेखक, गीतकार जावेद अख्तर हे लखनऊ या ठिकाणी पोहचले. शायर मुनव्वर राणा यांच्या कुटुंबाचं त्यांनी सांत्वन केलं. तसंच शायर मुनव्वर राणा यांच्या पार्थिवाला त्यांनी खांदाही दिला. यावेळी जावेद अख्तर चांगलेच भावूक झालेले पाहण्यास मिळाले. भारतीय शायरीचं खूप मोठं नुकसान झालं आहे अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट करुन दिली.

काय म्हणाले जावेद अख्तर?

सोमवारीच प्रसिद्ध शायर आणि कवी मुनव्वर राणा यांच्या निधनाचं वृत्त आलं. रविवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी जावेद अख्तर हे या ठिकाणी पोहचले होते. त्यांनी मीडियाशी संवाद साधत असताना मुनव्वर राणा यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. भारतातल्या शायरीचं आणि कवितेचं खूप मोठं नुकसान मुनव्वर राणा यांच्या निधनामुळे झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Raj Babbar daughter knew about his relationship with Smita Patil since she was 7
“ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Union Home Minister Amit Shah addresses party workers at state BJP mahavijayi convention for election victory
पंचायत ते संसद भाजपच! निवडणूक विजयासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
bmc has decided to completely ban POP idols during Maghi Ganeshotsav
‘पीओपी’वरून पुन्हा घोळ आयत्या वेळच्या घोषणेमुळे माघी गणेशोत्सवात मूर्तिकार, मंडळांसमोर फेरनियोजनाचे आव्हान
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?
What Uday Samant Said?
Uday Samant : उदय सामंत यांच्या हाती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याची अधिसूचना; म्हणाले, “आज अत्यंत आनंदाचा दिवस..”

हे पण वाचा- प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचं निधन, बंडखोर कवी काळाच्या पडद्याआड

जावेद अख्तर पुढे म्हणाले, “राहत इंदौरी, निदा फाजली आणि आता मुनव्वर राणा यांच्यासारख्या शायरांनी जगाचा निरोप घेतल्याने शायरीतली अदब हळूहळू लोप पावते आहे असं वाटू लागलं आहे. त्यांच्या निधनामुळे आपलं कधीही भरुन न येणारं नुकसान झालं आहे.” असंही मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केलं. त्याचप्रमाणे जावेद अख्तर यांनी मुनव्वर राणा यांच्या कुटुंबाची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.

हे पण वाचा- Javed Akhtar on Animal Movie: “जर हे चित्रपट हिट होत असतील…”, गीतकार जावेद अख्तर यांचे वक्तव्य

मुनव्वर राणा यांची गजल आई या गहन विषयावर आधारीत होती. त्यांच्याआधी कुणीही आई या विषयावर गझल लिहिली नव्हती. मात्र आई हा त्यांच्या गझलचा अविभाज्य भाग होऊन गेली. त्यांची शायरी आपल्या कायमच स्मरणात राहिल असंही जावेद अख्तर यावेळी म्हणाले.

Story img Loader