बॉलिवूडची वादग्रस्त अभिनेत्री शर्लिन चोप्राने ‘कामसूत्र ३डी’ चित्रपटाचा दिग्दर्शक रुपेश पॉलविरुद्ध केलेल्या तक्रारीची दखल  घेत पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. शर्लिन चोप्रा आणि  दिग्दर्शक रुपेश पॉल यांच्यातील वाद त्यामुळे शिगेला पोहचण्याची चिन्हे दिसत आहेत.
सांताक्रुझ पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीमद्ये शर्लिन चोप्राने ‘कामसूत्र ३डी’ चित्रपटाचा दिग्दर्शक रुपेश पॉल याने तिचे राहिलेले सात लाख रूपये मानधन दिले नसल्याचे म्हटले आहे.  रुपेशने आपल्याला धडा शिकविण्यासाठी ‘कामसूत्र ३डी’ चित्रपटातील आपला रोल नवीन मुलीला देऊन, चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान मी साकारलेली काही नग्न दृष्ये प्रसिद्ध करण्याची धमकी दिल्याचा आरोप शर्लिनने या तक्ररारीमध्ये केला आहे. शर्लिनच्या तक्रारीवरून सांताक्रुझ पोलिसांनी रूपेशच्या विरोधात प्राथमीक चौकशीला सुरूवात केली आहे.
आम्ही शर्लिनला पोलिसस्थानकात येवून तिचे मत नोंदवण्यास सांगितले आहे. मात्र, कामामध्ये व्यस्त असल्याचे कारण देत शर्लिनने ते न करता पोलिसांना पॉल याच्या विरोधामध्ये कारवाईची विनंती केली आहे. असे सांताक्रुझ पोलिस स्थानकाचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक अरून चव्हाण यांनी सांगितले.    

Story img Loader