दाक्षिणात्य सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी तिच्या अदांसाठी ओळखली जाते. अलीकडेच, तिच्या आगामी ‘विराट पर्वम’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, साई पल्लवीने केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. साई पल्लवीने बॉलीवूड चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये दाखवलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या दृश्याची मॉब लिंचिंगशी तुलना केल्याने नवा वाद सुरु झाला. त्यामुळे वातावरण तापले आहे आणि आता साई पल्लवीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आणखी वाचा : सोनम कपूरच्या बेबी शॉवरमधील गायक लियो कल्याणचा ‘तो’ फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल, म्हणाले…
एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावर बजरंग दलाच्या नेत्यांनी हैद्राबादच्या सुलतान बाजार पोलिस ठाण्यात साई विरोधात तक्रार दाखल केली आहे. पल्लवीने काश्मीर फाइल्स चित्रपटावर भाष्य करताना गौ राक्षकांबद्दल देखील वक्तव्य केले होते. तिच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सांगितले की ते व्हिडीओ पाहतील आणि कायदेशीर अभिप्रायानंतर पुढील कारवाई करतील. विराट पर्वम या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने काश्मीरी पंडीतांवर झालेल्या अत्याचारांची तुलना ‘गायीची तस्करी आणि लिंचिंगशी केली होती.
आणखी वाचा : ऐश्वर्याच्या पासपोर्टचा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले…
काय म्हणाली होती साई
”द काश्मीर फाईल्स या सिनेमात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादावर बोलायचं झाल्यास गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लिम चालकाला मारण्यात आलं, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या. काश्मीरमध्ये जे घडलं त्यात आणि मॉब लिंचिंगच्या घटनेत काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत,” साई पल्लवीच्या या वक्तव्यावर वाद सुरु झाला आहे.
आणखी वाचा : “आयुष्यात लाईफ पार्टनर नाही आणि आता या टप्प्यावर…”, करण जोहरने व्यक्त केली खंत
“मी लहान होते तेव्हापासून मला शिकवलं गेलं आहे की एक चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न कर. त्यामुळे मी तटस्थ राहणं पसंत करते. ज्यांच्यासोबत अन्याय होतो आहे, त्यांची मदत करणं. कुणी लहान कुणी मोठं असं काही नसतं, सगळे समान आहेत असं ज्या घरात शिकवलं गेलं त्या वातावरणात मी वाढले आहे. डावे आणि उजवे यांच्याविषयी मी ऐकलं आहे. पण त्यांच्यात कोण योग्य कोण अयोग्य हे मला सांगता येणार नाही. मला काश्मिरी पंडितांवर अन्याय करणारे आणि मॉब लिंचिंग करणारे सारखेच वाटतात. तेव्हा जे घडलं त्यात आणि मॉब लिचिंगच्या घटनांच्या वेळी जे घडलं त्यात काय फरक आहे?, असा सवाल साई पल्लवीने केला आहे.
आणखी वाचा : “मी त्याच्यावर प्रेम करते”; जॉनी डेप विरोधात मानहानीचा खटला हरल्यानंतर अँबर हर्डने केलेले वक्तव्य चर्चेत
“जर तुम्ही व्यक्ती म्हणून चांगले नसाल तर डावे किंवा उजवे असाल तरीही न्याय कुठेच नसेल. पण व्यक्ती म्हणून तुम्ही चांगले असाल तर तटस्थ म्हणून विचार करू शकता,” असंही साई पल्लवीने म्हटलं आहे.