अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यासह इतर सात जणांवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी सोनाक्षीने पैसे घेतले परंतु ऐनवेळी ती हजर राहिलीच नाही, म्हणून तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. इंडियन फॅशन अँड ब्युटी अवॉर्ड्स कंपनीचे मालक प्रमोद शर्मा यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३० सप्टेंबर २०१८ रोजी दिल्लीत इंडिया फॅशन अँड ब्युटी अवॉर्ड्सचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सोनाक्षीला बोलावण्यासाठी टॅलेंट फुलऑन कंपनीचे संचालक अभिषेक सिन्हा आणि एक्सीड एंटरटेन्मेंटशी संपर्क साधण्यात आला होता. कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी सोनाक्षीने एकूण २८ लाख १७ हजार रुपये घेतले होते. याव्यतिरिक्त संबंधित कंपनीला कमिशन म्हणून पाच लाख रुपये देण्यात आले होते. याबाबत लेखी करारसुद्धा झाला होता. ३० सप्टेंबरला कार्यक्रमाच्या दिवशी सोनाक्षीने आयोजकांना १० वाजताची फ्लाइट रद्द करून दुपारी सव्वा तीनची फ्लाइट बुक करण्यास सांगितलं. तरीसुद्धा ती आली नाही.

सोनाक्षीच्या नावाने कार्यक्रमात होर्डिंग लावण्यात आले होते. मात्र ऐनवेळी ती न आल्याने गर्दीने कार्यक्रमात गोंधळ घातला आणि तोडफोडही केली. म्हणूनच आयोजकांनी तिच्यासह इतर संबंधित व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर सोनाक्षीने अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police complaint filed against sonakshi sinha fraud accusation
Show comments