सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी त्यांचं जीवन संपवलं. त्यांच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येताच सर्वांनाच धक्का बसला आहे. तर आता त्यांच्या आत्महत्येच्या तपासातून एक मोठी माहिती समोर आली आहे.
नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जतमधील एन डी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं या मागचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही. पण नितीन देसाई यांच्यावर खूप मोठं कर्ज असल्याने त्यांनी हे पाऊल उचललं असं बोललं जात आहे.
हेही वाचा : “काही दिवसांपूर्वी त्याच्या मुलीच्या लग्नात तो…”, नितीन देसाईंच्या आत्महत्येवर सुबोध भावेची प्रतिक्रिया
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, स्टुडिओतील एका कर्मचाऱ्याने सकाळी साडेनऊच्या सुमारास कर्जत पोलीस स्टेशनला फोन करून नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली. तर त्यानंतर पोलीस आणि त्यांच्या फॉरेन्सिक टीमने त्यांनी ज्या खोलीत गळफास घेतला त्या खोलीची पाहणी केली. त्या दरम्यान पोलिसांना नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली कोणतीही चिट्ठी सापडली नाही, पण त्यांना काही ऑडिओ रेकॉर्डिंग्स सापडली आहेत. “या तपासात आम्ही एकेक पाऊल टाकत आहोत. फॉरेन्सिक टीमचं काम पूर्ण झालं की नितीन देसाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येईल,” असं पोलिसांनी ‘बॉम्बे टाइम्स’शी बोलताना सांगितलं.
आणखी वाचा : “त्याने बोलायला हवं होतं…”, नितीन देसाईंच्या आत्महत्येवर आदेश बांदेकरांची प्रतिक्रिया
नितीन देसाई यांनी ‘१९४२ ए लव्ह स्टोरी’पासून ‘जोधा अकबर’, ‘लगान’, ‘देवदास, हम दिल दे चुके सनम’पर्यंत कित्येक सुपरहिट चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. तर त्यांना चार राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते.