आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अनेक घटनांचे प्रतिबिंब चित्रपटाच्या माध्यमातून उमटत असते. समाजाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या ‘पोलीस’ या महत्त्वपूर्ण घटकाची कथा आता मराठी रुपेरी पडद्यावर येऊ घातली आहे. नाण्याच्या एकाच बाजूचा विचार आपण अनेकदा करत असतो दुसरी बाजू तशीच अंधारात रहाते. या अंधारात राहिलेल्या बाजूवर प्रकाश टाकण्याचं काम दिग्दर्शक राजू पार्सेकरने आपल्या आगामी ‘पोलीस लाईन’ एक पूर्ण सत्य या चित्रपटातून केलं आहे.
नुकतंच या सिनेमाचं म्युझिक लाँन्च डॉ. पी.एस.कृष्णमुर्ती यांच्या हस्ते संपन्न झालं. सिनेमाचा ट्रेलरसुध्दा यावेळी दाखवण्यात आला. ज्येष्ठ गायक अनुप जलोटा यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. “सदरक्षणाय खलनिग्रणाय” आणि “आख्खा शिनेमा पाहून घे’’ ही दोन गीते या चित्रपटात आहेत.
सामान्यांच्या सेवेला कायम तत्पर असणाऱ्या पोलिसांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्वतःच्या ही काही गरजा आहेत. अहोरात्र सामान्यांच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या पोलिसांच्या या गरजांचा विचार व्हावा यासाठी ‘पोलीस लाईन’ एक पूर्ण सत्य या चित्रपटाची निर्मिती जिजाऊ क्रिएशनतर्फे करण्यात आली. सतत ‘ऑन ड्यूटी’ असल्याने ढासळते आरोग्य, तणाव, निवासस्थानाची दुर्दशा, तुटपुंजा पगार अशा अनेक समस्यांमुळे पोलिस त्रस्त आहेत. पोलिसांना भेडसावणाऱ्या या समस्यांवर ‘पोलिस लाईन’ एक पूर्ण सत्य या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. हा चित्रपट सर्वसामान्यांना पोलिसांच्या वेदनेची नक्कीच जाणीव करून देईल.
जयंत सावरकर, सतीश पुळेकर, प्रदीप पटवर्धन, विजय कदम, प्रदीप कबरे, प्रमोद पवार, जयवंत वाडकर, संतोष जुवेकर, मानसी नाईक,निशा परुळेकर, पूर्णिमाअहिरे-केंड, नूतन जयंत, प्रणव रावराणे, सतीश सलागरे, जयवंत पाटेकर, स्वप्नील राजशेखर, शर्मिला बाविस्कर, मनोज टाकणे, बालकृष्ण शिंदे, अतुल सणस, रियाज मुलाणी, संदेश लोकेगांवकर, शितल कलापुरे, अश्विनी सुरपूर, लीना पालेकर, आरती कुलकर्णी, दिनेश मोरे, उमेश बोळके, पार्थ घोरपडे, युवराज मोरे, नवतारका सायली संजीव, या कलाकारांच्या भूमिका यात आहेत. २९ जानेवारीला ‘पोलिस लाईन’ एक पूर्ण सत्य हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader