बॉलीवूड बादशाह शाहरुख खानला डी कंपनीकडून पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. सदर धमकीनंतर त्याच्या ‘मन्नत’ या बंगल्याबाहेरील सुरक्षाव्यवस्थाही वाढवण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्माता अली मोरानीच्या घराबाहेर शनिवारी गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर लगेचच दुस-या दिवशी शाहरुख खानला कुख्यात गुंड रवी पुजारीचा फोन आला. मात्र, शाहरुख न भेटल्यामुळे त्याच्या सेक्रेटरीजवळ रवी पुजारीने संदेश सोडला की, शाहरुखने मोरानीसोबत काम करू नये. तसेच, त्यासोबत स्वतःचा मोबाईल नंबरही त्याने दिला. मोरानीनंतर शाहरुखच्या घरावरही हल्ला केला जाण्याची शक्यता असल्यामुळे गुन्हे शाखेच्या अधिका-यांना मन्नत बंगल्याबाहेर तैनात करण्यात आले आहे.
चित्रपट निर्माता करीम आणि अली मोरानी यांच्या जुहू येथील घरावर शनिवारी रात्री काही अज्ञातांनी गोळीबार केला होता. त्यानंतर मोरानी बंधूंनी तक्रार मोरानी बंधूनी स्थानिक पोलीस ठाण्यात केली. त्यापूर्वी त्यांनी गुंड रवी पुजारा धमकीचा फोनही आला होता. ‘राजा हिंदुस्तानी’, ‘दामिनी’, ‘दुश्मनी’ आणि ‘हमको तुमसे प्यार है’ या चित्रपटांचा कार्यकारी निर्माता म्हणून करीम आणि अली मोरानी या बंधूची ओळख आहे. त्यांनी शाहरुखच्या रा.वन चित्रपटाचेही कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले होते.
यापूर्वी बोनी कपूर, फरहान अख्तर, अक्षय कुमार, सोनू निगम, प्रिती झिंटा, सलमान खान आणि अन्य काही बॉलीवूड सेलिब्रेटींनाही अंडरवर्ल्डकडून धमकवणारे फोन करण्यात आले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा