Tunisha Sharma Committed Suicide: छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी (२४ डिसेंबर) दुपारी मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर एकच खळबळ उडाली. ती सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती. तिच्या आत्महत्येविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता पोलिसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव म्हणाले, “तुनिषा शर्मा अलिबाबा मालिकेतील अभिनेत्री आहे. तिने शुटिंग सुरू असतानाच स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा सहकलाकार शीजान खानला अटक करण्यात आली आहे. शीजानचे तुनिषाबरोबर प्रेमसंबंध होते. या प्रेमाच्या नैराश्येतूनच तुनिषाने ही आत्महत्या केली असं तिच्या आईचं म्हणणं आहे.”

CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
actress Sapna Singh teen son found dead in UP (1)
मित्रांबरोबर गेला, दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
soldier in Air Force committed suicide by shooting himself in head on duty
थरारक… वायुसेनेच्या जवानाची आत्महत्या, कर्तव्यावर तैनात असताना डोक्यात घातली गोळी अन्…
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Bengaluru
Bengaluru : धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पत्नीवर केले गंभीर आरोप

“तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल”

“याप्रमाणे पोलिसांनी तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर भारतीय दंड विधान कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला उद्या न्यायालयापुढे हजर केले जाईल,” अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची आत्महत्या! वसईमध्ये मालिकेच्या सेटवरच घेतला गळफास

दरम्यान, तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद कुमार यांनी ट्वीट केलं. “सामान्य घरातील प्रसिद्धी मिळविलेल्या प्रतिभावान, कष्ट करण्याची तयारी असलेल्या व्यक्ती आत्महत्या का करतात? त्यांच्या आई-वडिलांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागेल हा विचार ते करत नाहीत का? तुनिषा शर्माची बातमी ऐकल्यानंतर मी सुन्न झालो आहे.”

Story img Loader