सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. उर्मिला आता राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रत्येक विषयावर आपलं मत स्पष्टपणे मांडणं त्यांना आवडतं. सोशल मीडियाद्वारे उर्मिला व्यक्त होताना दिसतात. आता देखील त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक ट्वीट केलं आहे. तसेच त्यांनी महिलांना ट्रोल करणाऱ्यांबाबत संताप देखील व्यक्त केला आहे.
आणखी वाचा – Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरचं सुखी कुटुंब, पत्नी-मुलासोबतचे सुंदर फोटो
उर्मिला मातोंडकर यांचं ट्विट चर्चेत
आज स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी आहे. उर्मिला यांनी ट्विटरद्वारे स्वामी विवेकानंद यांचा फोटो शेअर केला आहे. “जेव्हा तुमच्यासमोर कोणतीच समस्या येत नाही तेव्हा हे निश्चित होतं की तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात.” हे वाक्य उर्मिला यांनी शेअर केलेल्या फोटोवर दिसत आहे. पण उर्मिला इथवरच थांबल्या नाहीत. त्यांनी हा फोटो शेअर करत सोशल मीडियाद्वारे महिलांची खिल्ली उडवणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.
त्या म्हणाल्या, “स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. तसेच काही ढोंगी लोकांना सांगू इच्छिते की, फेक अकाऊंटचा आधार घेत महिलांवर घाणेरड्या आणि अश्लिल कमेंट करण्यासाठी या महापुरुषाच्या फोटोचा वापर करु नका. तुमच्यासारख्या लोकांसाठी इतर ढोंगी स्वामींचे फोटो उपलब्ध आहेत.”
आणखी वाचा – Photos : सई ताम्हणकरचा कथित बॉयफ्रेंड आहे तरी कोण?, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
उर्मिला यांचं हे ट्वीट पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. काही जणांनी कमेंट करत स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केलं आहे. तर एका युजरने म्हटलं की, “उर्मिलाजी तुम्ही असंच आपलं मत मांडत राहा.”