बोल्ड भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाली आहे. योग्य मंच मिळाल्यास राजकारणात येण्याची इच्छा तिने व्यक्त केली. राजकारणात सक्रिय होण्याची मनिषा असलेली आणि महिला सक्षमीकरणाचा पुरस्कार करणाऱ्या मल्लिका शेरावतचा ‘डर्टी पॉलिटिक्स’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना मल्लिका म्हणाली, चांगले व्यासपीठ मिळाल्यास मला राजकारणात सक्रिय होण्याची इच्छा आहे. याद्वारे समाजातील महिलांसाठी काही करता आले तरच मला राजकारणात येण्यात रस आहे. अतिशय चांगल्याप्रकारे काम करत असलेल्या नरेद्र मोदींचे काम पाहून मला प्रेरणा मिळते. केवळ मीच नव्हे, तर देशातील जनतादेखील त्याच्या कार्यशैलीने प्रभावित आहे. के. सी. बोकाडीया दिग्दर्शित ‘डर्टी पॉलिटिक्स’मध्ये ओम पुरी, नसिरुद्दीन शाह आणि अनुपम खेर ह्या अनुभवी कलाकारांचांदेखील अभिनय आहे.