Ponniyin Selvan 2 box Office Collection Day 3: दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन: २’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. हा चित्रपट २८ एप्रिल रोजी जगभरात प्रदर्शित झाला व अवघ्या दोन दिवसांत चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला. चित्रपटाने तिसऱ्या दिवशीही चांगला गल्ला जमवला आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाचा पहिला भाग आला होता, तेव्हापासून चाहते दुसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जगभरात ‘पोन्नियिन सेल्वन: २’चा डंका, दुसऱ्याच दिवशी ओलांडला १०० कोटींचा पल्ला, भारतातून कमावले ‘इतके’ कोटी

‘पोनियिन सेल्वन २’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी २४ कोटींचा व्यवसाय केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी या चित्रपटाने २६.२ कोटींची कमाई केली. दोन्ही दिवसांपेक्षा चित्रपटाने तिसऱ्या दिवशी चांगली कमाई केली आहे. व्यापार विश्लेषक रमेश बाला यांच्या मते, ‘पोन्नियिन सेल्वन: भाग २’ ने केवळ तीन दिवसांत जगभरात १५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे आता या आठवड्यात चित्रपट कसा परफॉर्म करतो हे पाहावे लागेल.

‘सॅल्कनिक’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, या चित्रपटाने रविवारी म्हणजेच रिलीजच्या तिसर्‍या दिवशी ३० कोटी रुपयांचे कलेक्शन केले. यासह चित्रपटाची देशभरातील एकूण कमाई ८०.२० कोटींवर गेली आहे. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता तो लवकरच १०० कोटींचा जादुई आकडा पार करेल अशी अपेक्षा आहे. तर, या चित्रपटाने जगभरात १५० कोटींचा टप्पा गाठला आहे.