दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन: २’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी जगभरात प्रदर्शित झाला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करीत आहे. अवघ्या दोन दिवसांत १०० कोटींचा टप्पा गाठणाऱ्या या चित्रपटाची कमाई मात्र सहाव्या दिवशी मंदावली आहे. सुरुवातीच्या चार दिवसांत चित्रपटाने १५० कोटी कमावले होते. मात्र, आता चित्रपटाच्या कमाईत घट होताना दिसत आहे.

हेही वाचा- स्विमिंग पूलमध्ये सारा अली खानसह दिसणारा ‘मिस्ट्री मॅन’ कोण? व्हायरल फोटोनंतर चर्चांना उधाण

chhaava movie marathi writer kshitij patwardhan writes aaya re toofan song
मराठमोळ्या लेखकाने लिहिलंय ‘छावा’ सिनेमाचं गाणं! ए आर रेहमानसह पहिल्यांदाच एकत्र काम; म्हणाला, “शब्दरूपी सेवा…”
Santosh Juvekar
“जर माझं प्रेम असेल…”, अभिनेता संतोष जुवेकरला ‘अशी’…
aishwarya rai nimrat kaur abhishek bachchan
ऐश्वर्या राय बच्चनने पती अभिषेकसाठी केली पोस्ट, चाहते निम्रत कौरचा उल्लेख करत म्हणाले…
chhaava movie new song aaya re toofan out now marathi actors historical looks
आया रे तुफान…; ‘छावा’च्या नव्या गाण्यात दिसली ‘या’ मराठी कलाकारांची झलक! समोर आले सिनेमातील ऐतिहासिक लूक, पाहा फोटो
saif ali khan
सैफ अली खानची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटात ऋषी कपूर यांनी काम करण्यास दिलेला नकार; दिग्दर्शक खुलासा करत म्हणाले, “फक्त सात…”
Tula Shikvin Changlach Dhada
अधिपती भुवनेश्वरीला वचन देणार तर दुसरीकडे त्याच्याविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होणार; मालिकेत पुढे काय घडणार?
Zahan Kapoor receives an IMDb STARmeter
करीना कपूरच्या चुलत भावाचा दमदार अभिनय, ‘ब्लॅक वॉरंट’साठी मिळाला ‘हा’ पुरस्कार
Aamir Ali says not in touch with daughter after divorce with sanjeeda sheikh
८ वर्षांचा संसार मोडल्यावर पुन्हा प्रेमात पडल्याची अभिनेत्याने दिली कबुली; म्हणाला, ७ वर्षांच्या लेकीच्या संपर्कात नाही
Santosh Juvekar
काही चित्रपट पैशांसाठी करावे लागतात; प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मी कलाकार असलो तरी….”

‘पोन्नियिन सेल्वन : २’ संपूर्ण भारतात तमिळ, तेलगू, मल्याळम्, कन्नड आणि हिंदी या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला. दमदार ओपनिंग करणाऱ्या ‘PS-2’ च्या कलेक्शनमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मोठी घसरण झाली आहे. मंगळवारपासून म्हणजेच रिलीजच्या पाचव्या दिवसापासून चित्रपटाची कमाई कमी होऊ लागली. ‘PS-2’ ने मंगळवारी १०.५ कोटींची कमाई केली. त्यानंतर बुधवारी म्हणजेच सहाव्या दिवशी चित्रपटाने ७.७५ कोटींची कमाई केली. दरम्यान, चित्रपटाच्या सातव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सुरुवातीचे आकडेही आले आहेत. त्यानुसार ‘PS-2’च्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाली आहे.

हेही वाचा- दिवंगत सुशांत सिंह राजपूतला मोठ्या पडद्यावर पाहता येणार, ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या दिवशी पुन्हा प्रदर्शित होणार, कारण…

सकनिल्‍कच्‍या रिपोर्टनुसार, ‘PS-2’ ने सातव्या दिवशी अवघ्या ६.५० कोटींचा बिझनेस केला आहे. यासह, चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता १२८.५० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

हेही वाचा- The Kerala Story Row: केरळच्या मशिदीत पार पडला हिंदू जोडप्याचा विवाहसोहळा; एआर रेहमान यांनीही केला व्हिडिओ शेअर

‘पोन्नियिन सेल्वन: २’ हा कल्की कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्या याच नावाच्या लोकप्रिय साहित्यिक कादंबरीवरून रूपांतरित केलेला पीरियड ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटात चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, त्रिशा आणि जयम रवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला, जयराम, प्रकाश राज, विक्रम प्रभू, सरथकुमार, पार्थिवन आणि प्रभू साहाय्यक भूमिकेत आहेत.

Story img Loader